सईबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सई भोसले
सईबाई
जन्म सई निंबाळकर
१६३३
फलटण, महाराष्ट्र
मृत्यू ५ सप्टेंबर १६५९ (२६ वर्ष)
रायगड, पुणे
ख्याती महाराणी
धर्म हिंदू
जोडीदार शिवाजी महाराज
अपत्ये सखूबाई निंबाळकर
रेणूबाई जाधव
अंबिकाबाई महाडिक
संभाजी महाराज
वडील मुधोजीराजे निंबाळकर
आई रेऊबाई निंबाळकर

सईबाई भोसले (१६३३ – ५ सप्टेंबर १६५९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी व दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई होत्या. सईंचे माहेर फलटणचे निंबाळकर घराणे होते. त्या मुधोजीराजे निंबाळकर यांच्या कन्या व बजाजीराजे निबाळकर यांच्या भगिनी होत्या.

१६ मे १६४० रोजी शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा लालमहालवर विवाह झाला व १४ मे १६५७ रोजी महाराणी सईबाईने राजकुमार संभाजींना जन्म दिला. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना आणि शिवाजी महाराजांची अफजलखानाशी ऐतिहासिक भेट होण्याआधीच दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबर १६५९ रोजी सईबाईंचे निधन झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.