जिवा महाला
जिवा महाला हा शिवाजीराजांचा अंगरक्षक होता, त्याने प्रतापगडाच्या लढाईत शिवाजींना वाचवले होते.
अनुक्रमणिका
गाव[संपादन]
जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.
घराणे[संपादन]
वंशावळ – जिवा महालाचा मोठा भाऊ हा ताना (तानाजी) महाले असावा. जिवा महालाचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय.
हरी आणि सुभानजी हे जिवा महालाचे खापरपणतू होतात. जिवा महाला यांचे वडील पहिलवान होते ते शिवाजी राजांचे वडील शहाजी यांच्या सेवेत होते युद्ध समई त्यांचा पाय गमवावा लागला होता.
पराक्रम[संपादन]
शिवाजीने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाजी ने शिवाजीराजांचे प्राण वाचले. या प्रसंगी जिवा महालाचे वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी, वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जीवा महाला यांची समाधी आहे. जीवा महालांचे वडिलांनी जिवा महाला यांना पहिलवाणीचे धडे दिलेत दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा पटाईत होता आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालविण्याचे कथन करतात जीवा महाला सुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता व सैयद बंडा ने तलवार महाराजांवर उगारली तोच दंडपट्टा काढून जिवा महालाने त्याला पालथा पाडले होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा’, ही म्हण या प्रसंगावरून पडली.
छत्रपतींकडून बक्षीस[संपादन]
छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
पुस्तके[संपादन]
- जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत; स्वाभिमान विचार प्रकाशन--कोल्हापूर)
- जिवा महाला (लेख्क - प्रभाकर भावे)
- जिवा महाला (कादंबरी, लेखक - प्रा. डाॅ.सुरेश गायकवाड)
- शिवरक्षक जीवाजी महाला (लेखक - हरीश ससनकर)
रस्ता[संपादन]
मुंबईत अंधेरी (पूर्व) येथील ना.सी. फडके रस्ता आणि स्वामी रस्ता यांना जोडणाऱ्या एका छोट्या रस्त्याला जिवा महाले रोड म्हणतात.
चौक[संपादन]
शिवरत्न जिवाजी महाले चौक (अहमदनगर)
पुरस्कार[संपादन]
शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवा महाले याच्या नावाने दरवर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:-
- सौ. अपर्णा रामतीर्थकर (सोलापूर),
- अमरनाथ आंदोलनाचे नेते ॲड. लीलाकिरण शर्मा
- उद्धव ठाकरे
- शरद पोंक्षे
- गोरक्षक सतीशकुमार प्रधान
- शहीद कर्नल संतोष महाडीक
- कर्नल संभाजीराव पाटील (कऱ्हाड)
- सुभाष कोळी (सांगली),
वगैरे.