जिंजीचा किल्ला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| किल्ले जिंजी | |
किल्ले जिंजीचे विहंगम दृश्य | |
| नाव | किल्ले जिंजी |
| उंची | ९२ मीटर/३०२ फूट |
| प्रकार | गिरिदुर्ग |
| चढाईची श्रेणी | सोपी |
| ठिकाण | जिंजी, तमिळनाडू |
| जवळचे गाव | जिंजी |
| डोंगररांग | |
| सध्याची अवस्था | व्यवस्थित |
| स्थापना | ११९० |
जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनः प्रतिष्ठापना केली.
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला.
जागतिक वारसा स्थळ
[संपादन]छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे.[१]
जिंजी किल्ला
[संपादन]जिंजी किल्ला हा आठ किल्ल्यांचा समूह आहे.
- राजगिरी
- कृष्णगिरी
- चंद्रयानदुर्ग-सारंगगड
- चकिलादुर्ग -लालगड
- कुसमलाई -मदोन्मतगड
- मुतूनायकनदुर्गम -गर्वगड
- कुत्थअरसीदुर्ग -चेलगड
- जिंजीकोटे
ह्या किल्ल्यांना इसवी सन पूर्व २०० पासून इतिहास आहे. तो खालीलप्रमाणे आहे.
- जैन वस्त्या
- पल्लव राजे
- चोल राजे
- पांडियन
- कोन राजे
- होयसाळ
- कुरुंब
- विजयनगरचे नायक
- आदिलशाही
- छत्रपती शिवाजी महाराज-२० मे १६७७.
- छत्रपती संभाजी महाराज
- छत्रपती राजाराम महाराज
महत्त्वाचे प्रसंग -
- राक्षसतागडीची लढाई.
- दक्षिण दिग्विजय मोहीम इ.स.१६७७.
- रुद्राजी साळवे किल्ला पुनर्बांधणी. किल्ले नामकरण.
- रघुनाथ हणमंते -छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ.
- हरजीराजे महाडिक-छत्रपती संभाजी महाराजांचा काळ
- मराठा सेनापती -धनाजी जाधवराव व संताजी घोरपडे.
- २० वर्षे राज्य (छत्रपती शिवाजी, संभाजी, राजाराम महाराज यांचा काळ)
- इ.स. १५९९ -फादर पिमेंटा जिंजी भेट.
- अर्कोट जिल्हा कलेक्टर गरेस्टिन भेट.
- इतिहासकार ऑर्म भेट.
हा किल्ला आजही शासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदररीत्या जतन केला आहे. [२]
जिंजी
[संपादन]तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहे. हे मद्रास - धनुष्कोडी लोहमार्गावर, मद्रासपासून सुमारे 121 कि.मी. तसेच तिंडीवनम् - तिरुवन्नामलई हमरस्त्यावर वसलेले आहे. या किल्ल्याला ट्रॉय ऑफ थदि ईस्ट असे संबोधले जायचे. या गावाच्या पश्चिमेस सुमारे 1.5 कि.मी.वर येथील इतिहास प्रसिद्ध दुर्गम किल्ला आहे.
- राजगिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे.
यांतील राजगिरी सर्वांत उंच (सुमारे 183 मी.) असून त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे, कल्याण महाल, कोठारे, स्नानाचे चौरंग, तोफा, कैद्यांची विहीर हे उल्लेखनीय आहेत. हा किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसले, तरी बहुधा हा विजयानगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा, असा तर्क आहे. राजाराम महाराज या किल्ल्यात असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने दिलेला वेढा इतिहास प्रसिद्धच आहे.[ संदर्भ हवा ] संताजी घोरपडे यांनी मोगलाई फौजांना रोखून धरल्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांना रायगड ते जिंजी प्रवास करता आला. शिमोगा येधे मुघलांनी जेव्हा राजाराम महाराज यांच्या सैन्यावर हल्ला केला,तेव्हा संताजीचे धाकटे बंधू बर्हिजी ह्यांनी पाठीवर बसवून राजाराम महाराजांना जिंजीस पोहोचवले.