चंद्रसेन जाधव
Appearance
चंद्रसेन जाधव हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होती. हे धनाजी जाधव यांचे पुत्र होते. १७०८ मध्ये छत्रपती शाशाहू महाराज यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी धनाजींच्या पश्चात चंद्रसेन यांना सरसेनापतीपद दिले.
पुढे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे आणि सत्तेच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांनी शाहू महाराजांची साथ सोडून निजामाची साथ धरली होती. मराठा आणि निजाम यांच्यातील राजकारणात चंद्रसेन जाधव यांची भूमिका अत्यंत निर्णायक होती. त्यांना निजाम-उल्-मुल्कने आपल्या दरबारात सन्मानाचे स्थान आणि जहागीर देऊन राजा ही पदवी बहाल केली होती.[१][२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |