धनाजी जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनाजी जाधव (इ.स. १६५० - इ.स. १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजीशी झालेल्या युद्धामध्ये संताजी मरण पावले. त्‍यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धन सातारला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या पत्नीला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. हे दाम्पत्या बरीच वर्षे जाधव यांच्या आश्रयाखाली होते. त्यांचे घनिष्ठ संबध होते. धनाजी जाधव यानी शाहुमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथम पेशवाईची सूत्रे मिळाली.