अफझलखान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अफझल खान
Afzalkhan.jpg
मृत्यू १० नोव्हेंबर १६५९
प्रतापगड
अपत्ये २ मुले


अफजल खान (मृत्यू १० नोव्हेंबर १६५९) हा आजच्या विजापूरवरती राज्य करणार्‍या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने शिवाजीविरूद्ध लढा दिला. शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटी दरम्यान संभाजी कावजी यांनी त्यांचा वध केला आणि प्रतापगडच्या लढाई त्याची सेना पराभूत झाली. [१][२]

ऐतिहासिक नोंदींमध्ये त्यांचे नाव "अफझूल खान" असेही आढळते.[३]


सुरवातीचे जीवन[संपादन]

अली अदिल शाह दुसरा, ज्याने अफझल खानची विजापुरचा सरदार म्हणून नियुक्ती केली

बीजापुर सल्तनतच्या अली आदिल शाह दुसरा च्या काळात अफझल खान एक प्रमुख सरदार होता. त्याच्या सशक्त कौशल्याने आणि हुकमती क्षमतेने त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्याने दरबारात उच्चपद प्राप्त केले. असे म्हटले जाते की त्याला अदिली म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध तलवारीने सन्मानित करण्यात आले होते, ही तलवार हिर्‍यांनी भरलेली होती. अफजल खानला "ढाल-गज" नामक अत्यंत लोकप्रिय अशी हत्तीची अंबारी देण्यात आली होती. त्याने १०,००० सैनिकांची वैयक्तिक फौजेचे नेतृत्व केले.[४]


[प्रतापगडाची लढाई]:-अफजलखान तुळजापूर,शिखर शिंगणापूर ,पंढरपूर अशी गावे लुटत वाई ला येऊन पोहोचला...त्याने तुळजापूरची तुळजाभवानी घण घालून तोडली...शिवराय खुल्या मैदानात येऊन लढतील असा समज खानाचा होता परंतु खुल्या मैदानात खानाच्या फौजेसमोर आपला टिकाव लागणार नाही हे महाराज ओळखून होते...खान गनिमी काव्याने संपवायचा असा निर्धार महाराजानी केला आणि आपले वकील पंताजी बोकीलाना खानाकडे पाठवले...पंतांच्या माध्यस्तीने खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला येण्यास भाग पाडले आणि तिथेच खानाचा वाघनख्याने कोथळा फाडला...आणि नंतर त्याचे विधिवत दफन करून दिवा बत्तीची सोय सरकारातून शिवरायांनी करून दिली होती...जगदंब

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ जदुनाथ सरकार (१९९२). शिवाजी अ‍ॅण्ड हीज टाइम्स. ओरिएन्ट ब्लॅकस्वान. pp. ४७–५२. आय.एस.बी.एन. 978-81-250-1347-1. 
  2. ^ जे. नाझरेथ (२००८). क्रिएटिव्ह थिंकींग इन वॉरफेअर (सचित्र आवृत्ती.). लान्सर. pp. १७४–१७६. आय.एस.बी.एन. 978-81-7062-035-8. 
  3. ^ आर. एम. बेथम (१९०८). मराठाज अ‍ॅण्ड दखनी मुसलमान्स. एशियन एज्युकेशनल सर्व्हिसेस. pp. १३६. आय.एस.बी.एन. 978-81-206-1204-4. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी पाहिले. 
  4. ^ शेख मोहम्मद इक्रम (१९६६). इस्लाम रुल इन इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान, इ.स. ७११-१८५८: अ पॉलिटिकल अ‍ॅण्ड कल्चरल हिस्ट्री. स्टार बुक डेपो. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.