देहू रोड रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

देहू रोड रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराजवळील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक पुणे-मुंबई महामार्गाजवळ आहे. येथून देहू गाव जवळ आहे. भारतीय लष्कराच्या अनेक तुकड्या या स्थानकाचा वापर करतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथून जवळ आहे.

या स्थानकाला चार फलाट असून त्यातील दोन वापरात आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या तसेच लांबच्या पल्ल्याच्या सगळ्या पॅसेंजर गाड्या येथे थांबतात. या शिवाय सह्याद्री एक्सप्रेस येथे थांबते. एकेकाळी मुंबई-मद्रास जनता एक्सप्रेस येथे थांबे. सध्या न वापरले जाणारे फलाट पूर्वी सेन्ट्रल आॅर्डनन्स डेपो (सीओडी)साठी असलेल्या खास पुणे-देहूरोड लोकल गाडीसाठी होते. ही गाडी कोळशाच्या इंजिनवर चाले, व थेट डेपोपर्यंत जाई.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]