Jump to content

नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागपूर रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार

नागपूर जंक्शन हे भारत देशाच्या नागपूर शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. नागपूर शहर भौगोलिक दृष्ट्या भारताचे केंद्र असल्यामुळे नागपूर हे देशामधील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचे पूर्व-पश्चिम धावणारा मुंबई-कोलकाता व उत्तर धावणारा दिल्ली-चेन्नई हे सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी दोन रेल्वेमार्ग नागपूरमध्ये भेटतात. तसेच उत्तर भारतामधून दक्षिणेकडे जाणाऱ्या बव्हंशी रेल्वेगाड्या नागपूरमधून जातात. नागपूर रेल्वे विभागाचा मध्य रेल्वेदक्षिण पूर्व मध्य रेल्वे ह्या दोन क्षेत्रांमध्ये समावेश होतो.

१८६७ सालापासून चालू असलेल्या नागपूर स्थानकावर ८ फलाट असून दररोज सुमारे २३९ गाड्या येथे थांबतात. नागपूरमध्ये मिळणारे सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.

इतिहास

[संपादन]

हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रँक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्थानक आहे.[] नागपूर हे भारताचे महत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपूर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणाऱ्या रेल्वे स्थानकचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्थानक होते.

सेवा

[संपादन]

पॅसेंजर, एक्सप्रेस, मेल, दुरान्तो, राजधानी, गरीब रथ अशा ट्रेनचा समावेश असणाऱ्या आणि देशाचे विविध ठिकाणी जाणाऱ्या एकूण २७८ ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकवर थांबतात.[] यापैकी ५३ दररोज आणि २३ तेथूनच मार्गस्त होणाऱ्या ट्रेन आहेत. साधारण १.६ लाख प्रवाशी येथे ये जा करतात. येथे ८ फ्लॅट फॉर्म आहेत. याचे १३ ट्रॅक आहेत. याचे कोड नाव NGP आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात आहे.[] येथा पार्किंग व्यवस्था आहे.

संपर्क

[संपादन]

नागपूर हे ख्यातनाम आहे ते केवळ महाराष्ट्राचे द्वितीय राजधानीचे शहर आहे म्हणून किंवा पर्यटक स्थळं आहे म्हणून नाही तर त्याची ख्याती ते एक भारत देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून आणि ते व्यावसायिक दृष्टीने राज्यासाठी महत्त्वाचे आहेच पण देशासाठीही आहे. तेथेच हे नागपूर रेल्वे स्थानक आहे.[]

विकास

[संपादन]

भारत देशातील २२ रेल्वे स्थानकचा आंतरराष्ट्रीय पद्दतीने विकास करून दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव झालेला आहे त्यात नागपूर रेल्वे जंक्शन स्टेशनचा समावेश आहे.[] हे काम सार्वजनिक भागीदारी कंपनी आणि मध्य रेल्वे एकत्रितपने करताना सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, यावर अधिक भर देण्यात प्रयत्न शील आहे. नजीकचे अजनी रेल्वे स्थानकचे टर्मिनस बनवून लांब पल्याच्या ट्रेन तेथून वळविण्याचे धोरण आहे.[] येथेच बोगी ठेवण्याची व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे. नागपूर ही उपराजधानी असल्यामुळे येथून जुनी दिल्ली साठी उपराजधानी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आहे. याशिवाय नागपूरमध्ये लोकल रेल्वे स्थानक करण्याचीही योजना आहे त्यात अजनी , इतवारी, कळमना आणि गोधणीचा समावेश आहे. नागपूर ते अजनी या रेल्वे मार्गाचे अंतर ३ किमीआहे की जे भारतीय रेल्वेचा सर्वात कमी अंतर असणारा मार्ग आहे. मूलतः रेल्वे चालकांना अजनी येथे वर्कशॉप पर्यत जाण्याची ही व्यवस्था आहे.

मार्ग

[संपादन]

हावडा-नागपूर-मुंबई, दिल्ली-चेन्नई, नागपूर- हैदराबाद, नागपूर-बिलासपुर सेक्शन, नागपूर- नागभीड (NG) आणि नागपूर-छिंदवाडा (NG) हे मार्ग आहेत.

प्रमुख गाड्यांचे वेळापत्रक (सुपरफास्ट, मेल आणि एक्सप्रेस)

[संपादन]

नागपूर जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या 'उत्तर-दक्षिण' आणि 'पूर्व-पश्चिम' अशा दोन्ही मुख्य मार्गांना जोडणारे महत्त्वपूर्ण स्थानक आहे.

गाडी क्रमांकगाडीचे नावकुठूनकुठेआगमनप्रस्थान
१२४३७राजधानी एक्सप्रेससिकंदराबादनवी दिल्ली०६:२५०६:३०
१२४३८राजधानी एक्सप्रेसनवी दिल्लीसिकंदराबाद२०:२५२०:३०
२०८२५वंदे भारत एक्सप्रेसबिलासपूरनागपूर१२:१५-
२०८२६वंदे भारत एक्सप्रेसनागपूरबिलासपूर-१४:०५
१२२८९मुंबई दुरंतोनागपूरमुंबई-२०:४०
१२२९०मुंबई दुरंतोमुंबईनागपूर०९:२०-
१२१३९सेवाग्राम एक्सप्रेसमुंबईनागपूर११:१०-
१२१४०सेवाग्राम एक्सप्रेसनागपूरमुंबई-२१:१५
१२८०९हावडा - मुंबई मेलहावडामुंबई११:१०११:१५
१२८१०हावडा - मुंबई मेलमुंबईहावडा१३:५५१४:००
१२११४नागपूर - पुणे गरीब रथनागपूरपुणे-१८:३५
१२११३नागपूर - पुणे गरीब रथपुणेनागपूर०९:१०-
१२६१५ग्रँड ट्रंक एक्सप्रेसचेन्नईनवी दिल्ली११:३०११:३५
१२६१६ग्रँड ट्रंक एक्सप्रेसनवी दिल्लीचेन्नई१०:१५१०:२०
१२७२१दक्षिण एक्सप्रेसहैदराबादनवी दिल्ली०९:२५०९:३०
१२७२२दक्षिण एक्सप्रेसनवी दिल्लीहैदराबाद१७:०५१७:१०
१२८३४हावडा - अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेसहावडाअहमदाबाद१९:००१९:०५
११०४६दीक्षाभूमी एक्सप्रेसकोल्हापूरधनबाद०९:२००९:२५
१८२३९शिवनाथ एक्सप्रेसबिलासपूरईतवारी (नागपूर)०३:५०-
१८०३०शालिमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसशालिमारलोकमान्य टिळक टर्मिनस१३:२५१३:३५

नोंद:

  • रेल्वेचे वेळापत्रक बदलू शकते, त्यामुळे प्रवासापूर्वी भारतीय रेल्वेच्या पोर्टलवर तपासणे आवश्यक आहे.
  • फिका हिरवा रंग सुपरफास्ट, राजधानी, दुरंतो, गरीब रथ आणि वंदे भारत यांसारख्या जलद गाड्यांसाठी वापरला आहे

स्थानिक, पॅसेंजर आणि मेमू गाड्यांचे वेळापत्रक

[संपादन]

नागपूरहून प्रामुख्याने वर्धा, गोंदिया, आमला आणि छिंदवाडा या दिशांना स्थानिक सेवा चालवल्या जातात.

गाडी क्रमांकगाडीचे नावकुठूनकुठेआगमनप्रस्थान
०८७४४ईतवारी - तिरोडी मेमूईतवारी (नागपूर)तिरोडी-०७:४५
०८७४३तिरोडी - ईतवारी मेमूतिरोडीईतवारी (नागपूर)२३:०५-
५१२९४नागपूर - आमला पॅसेंजरनागपूरआमला-१८:१५
५१२९३आमला - नागपूर पॅसेंजरआमलानागपूर०९:५०-
६८७१४ईतवारी - गोंदिया मेमूईतवारी (नागपूर)गोंदिया-०७:३५
६८७१३गोंदिया - ईतवारी मेमूगोंदियाईतवारी (नागपूर)१२:१०-
०८११९नागपूर - छिंदवाडा पॅसेंजरनागपूरछिंदवाडा-०७:४५
०८१२०छिंदवाडा - नागपूर पॅसेंजरछिंदवाडानागपूर२१:३५-
६८७१५नागपूर - भुसावळ मेमूनागपूरभुसावळ-१५:३०
६८७१६भुसावळ - नागपूर मेमूभुसावळनागपूर१२:५०-
५१२६२वर्धा - नागपूर पॅसेंजरवर्धानागपूर१०:३०-
५१२६१नागपूर - वर्धा पॅसेंजरनागपूरवर्धा-१९:२०
०८७५६नागपूर - रामटेक मेमूनागपूररामटेक-०५:४०
०८७५१रामटेक - नागपूर मेमूरामटेकनागपूर२२:३०-
०८२६९नागपूर - बल्लारशाह पॅसेंजरनागपूरबल्लारशाह-०७:२०
०८२७०बल्लारशाह - नागपूर पॅसेंजरबल्लारशाहनागपूर२१:४०-

नोंदी:

  • निळा रंग मेमू गाड्या दर्शवण्यासाठी वापरला आहे, ज्या प्रामुख्याने जलद स्थानिक प्रवासासाठी असतात.
  • ईतवारी हे नागपूरमधील हे दुसरे महत्त्वाचे टर्मिनल असून अनेक स्थानिक गाड्या तेथून सुटतात.
  • भारतीय रेल्वेच्या धोरणानुसार अनेक 'पॅसेंजर' गाड्या आता 'स्पेशल' किंवा 'मेमू' मध्ये रूपांतरित केल्या जात आहेत, त्यामुळे प्रवासाआधी अधिकृत अ‍ॅपवर खात्री करणे योग्य ठरेल.

संदर्भ

[संपादन]
  1. "नागपूर स्टेशनला इमारत ९० वर्षे झाली".
  2. "नागपूर जंक्शनला येणाऱ्या रेल्वेगाड्यांबद्दल".
  3. "मध्य रेल्वेच्या विभाग बद्दल संक्षिप्त".
  4. "नागपूर रेल्वे स्थानकची यादी".
  5. "नागपूर रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे टर्मिनल मध्ये विकसित करणे गरजेचे: विशेषज्ञ".
  6. "भारतीय रेल्वे बद्दल १० मनोरंजक तथ्य".