Jump to content

कासारवाडी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कासारवाडी रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराजवळील कासारवाडी उपनगरातील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्गाच्या तिठ्यावर असून कासारवाडी, भोसरी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलख हे भाग या स्थानकाचा वापर करतात. या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. लांबच्या पल्ल्याच्या गाड्या येथे थांबत नाहीत.