Jump to content

भुसावळ जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भुसावळ जंक्शन
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता भुसावळ, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
गुणक 21°2′49″N 75°47′17″E / 21.04694°N 75.78806°E / 21.04694; 75.78806
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग
भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग
फलाट 9
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६०
विद्युतीकरण होय
संकेत BSL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
भुसावळ is located in महाराष्ट्र
भुसावळ
भुसावळ
महाराष्ट्रमधील स्थान

साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग भुसावळ रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या भुसावळमार्गे जातात. याशिवाय येथून जळगाव मार्गे सुरतकडे जाणारा रेल्वेमार्ग मुख्य मार्गांना जोडतो.

इतिहास

[संपादन]

भारतातील पहिला रेल्वेमार्ग १८५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] भुसावळ रेल्वे स्थानक १८६० मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६९ साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Chronology of railways in India, Part 2 (1832 - 1865). "IR History: Early Days – I". २०१२-११-२० रोजी पाहिले.
  2. ^ "Historical Milestones". Central Railway. 2013-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ "विद्युतीकरण इतिहास" (इंग्लिश भाषेत). २०१३-०३-१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)