Jump to content

पनवेल रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पनवेल

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता पनवेल, रायगड जिल्हा
गुणक 18°59′28″N 73°07′17″E / 18.99111°N 73.12139°E / 18.99111; 73.12139
मार्ग

हार्बर मार्ग ट्रान्स हार्बर मार्ग वसई रोड - दिवा- पनवेल - रोहा मार्ग

पनवेल - कर्जत मार्ग
फलाट
इतर माहिती
पुनर्बांधणी २००७
विद्युतीकरण होय
संकेत PNVL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
पनवेल is located in मुंबई
पनवेल
पनवेल
मुंबईमधील स्थान
उपनगरी रेल्वे फलाट

पनवेल हे पनवेल शहरामधील व नवी मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवर, कोकण रेल्वेवर आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी, ठाणे, अंधेरी साठी धीम्या लोकल व मध्य रेल्वेवरून डहाणू, वसई साठी लोकल धावतात. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलला थांबतात. पनवेल - पुणे पॅसेंजर, पनवेल - गोरखपूर एक्सप्रेस, पनवेल - नांदेड एक्सप्रेस इ. मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेसदेखील पनवेलवरून धावते.

पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. हे रेल्वे स्थानक सिडको द्वारे विकसित केले गेले आहे. पनवेल येथे नवीन टर्मिनस तयार होत आहे. त्यामुळे सीएसएमटी, दादर प्रमाणे पनवेल येथुन सुद्धा दूर अंतराच्या रेल्वे गाड्या सुरू होतील यामुळे दादर, सीएसएमटी, कल्याण, एलटीटी या स्थानकांचा भार कमी होईल तसेच उपनगरीय रेल्वेवरील ताणही कमी होईल. नवी मधील नागरिकांना कल्यान, ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही

पनवेल
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खांदेश्वर
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
सोमाटणे, चिखले
स्थानक क्रमांक: २५ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ६० कि.मी.
पनवेल
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खांदेश्वर
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
स्थानक क्रमांक: १५ ठाणेपासूनचे अंतर: ५० कि.मी.
पनवेल
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मुंबई उपनगरी रेल्वे: पनवेल-दिवा-वसई मार्ग उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कळंबोली
स्थानक क्रमांक: दिवा जंक्शनपासूनचे अंतर: कि.मी.