मुंबई–पुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग
Mumbai Pune Expressway map.svg
एक्सप्रेसवेचा नकाशा
खंडाळा येथून टिपलेले चित्र
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ९४.५ किलोमीटर (५८.७ मैल)
सुरुवात कळंबोली, नवी मुंबई
प्रमुख जोडरस्ते शीव पनवेल महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४
शेवट देहू रोड, पुणे जिल्हा
स्थान
शहरे नवी मुंबई, पनवेल, लोणावळा, पुणे
जिल्हे रायगड जिल्हा, पुणे जिल्हा
राज्ये महाराष्ट्र
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग
किमी
पुण्याकडून
0 द्रुतगती मार्ग आरंभ
7.6 सोमाटणे फाटा
11 तळेगाव टोल नाका
22.1 कामशेत-२ बोगदा(१९१ मी)
23.3 कामशेत-१ बोगदा(९३५ मी)
43.9 खंडाळा
46.6 खंडाळा बोगदा(३२० मी)
51.9 आडोशी बोगदा (२३० मी)
60.4 खालापूर टोल नाका
67.7 माडप बोगदा(२९५ मी)
70 पाताळगंगा नदी
78.3 भातन बोगदा(१०४६ मी)
84.6 शेडुंग फाटा
93.1 द्रुतगती मार्ग समाप्त
नवी मुंबईकडे

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग (Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway; स्थानिक प्रचलित नाव: एक्सप्रेसवे) हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग होता. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा द्रुतगतीमार्ग मुंबईपुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गाद्वारे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे नाव दिले गेले.

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ तासांवर आला आहे. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहने, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात.

इतिहास[संपादन]

भारताची आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ह्यांदरम्यान प्रवासासाठी जुना मुंबई–पुणे महामार्ग (रा.मा. ४) ब्रिटिशांच्या काळात बांधला गेला होता. ह्या मार्गावर सातत्याने वाढती वाहतूक व वर्दळ पाहता व भविष्यामधील वाढीव वाहतूकीचा अंदाज घेता ह्या हमरस्त्याला पर्यायी मार्ग बांधणे गरजेचे बनले होते. १९९० साली महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या राइट्स व ब्रिटिश कंपनी स्कॉट विल्सन समूह ह्यांना नव्या दृतगतीमार्गाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी नेमले. १९९४ साली राइट्सने आपला अहवाल सादर केला ज्यामध्ये ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹ १,१४६ कोटी इतका अपेक्षित होता. १९९७ साली महाराष्ट्र शासनाने ह्या महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा ह्या तत्त्वावर एकूण ३० वर्षे पथकर आकारून बांधकामखर्च वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डिसेंबर १९९७ मध्ये रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या. ह्या प्रकल्पाच्या लोकप्रियतेमुळे तब्बल ५५ निविदा दाखल केल्या गेल्या ज्यांपैकी ४ कंत्राटदारांना १ जानेवरी १९९८ रोजी संपूर्ण एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. महामार्गाचा पहिला टप्पा २००० साली उघडण्यात आला व एप्रिल् २००२ मध्ये संपूर्ण महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

मार्गाचा तपशील[संपादन]

मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग नवी मुंबई शहराच्या कळंबोली ह्या नोडपाशी सुरू होतो. शीव पनवेल महामार्गरा.मा. ४ येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन द्रुतगतीमार्ग पुण्याबाहेरील देहू रोड येथे रा.मा. ४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा पिंपरी चिंचवडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी बोरघाटामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. द्रुतगतीमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ७ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, तळेगाव व सोमाटणे.

मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. खालापूरतळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून मोटार कारना एकेरी फेरीसाठी ₹२३० इतका टोल मोजावा लागतो. दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारी वाहनांना द्रुतगतीमार्गावर प्रवेश नाही.

बोगदे[संपादन]

एक्सप्रेसवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधले आहेत.

बोगदा लांबी
1 भातन मुंबई–पुणे: १,०४६ मी
पुणे-मुंबई: १,०८६ मी
2 माडप मुंबई–पुणे: २९५ मी
पुणे-मुंबई: ३५१ मी
3 आडोशी मुंबई–पुणे मार्गावर हा बोगदा लागत नाही
पुणे-मुंबई: २३० मी.
4 खंडाळा मुंबई–पुणे: ३२० मी
पुणे-मुंबई: ३६० मी
5 कामशेत-1 मुंबई–पुणे: ९३५ मी
पुणे-मुंबई: ९७२ मी
6 कामशेत-2 मुंबई–पुणे: १९१ मी
पुणे-मुंबई: १६८ मी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग
किमी
नवी मुंबईकडून
0 कळंबोली नोड (द्रुतगती मार्ग आरंभ)
8.5 शेडुंग फाटा
14.8 भातन बोगदा (१०४६ मी)
23.1 पाताळगंगा नदी
25.4 माडप बोगदा (२९५ मी)
32.7 खालापूर टोल नाका
खोपोलीकडे
46.5 खंडाळा बोगदा (३२० मी)
खंडाळ्याकडे
23.1 उल्हास नदी
लोणावळ्याकडे
69.8 कामशेत-१ बोगदा (९३५ मी)
71 कामशेत-२ बोगदा (१९१ मी)
82.1 तळेगाव टोल नाका
तळेगावकडे
85.5 सोमाटणेकडे
93.1 द्रुतगती मार्ग समाप्त
93.2 पश्चिम बाह्यवळण महामार्ग
पुण्याकडे

सुरक्षा[संपादन]

सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते द्रुतगतीमार्गावरील अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडले. १८ जुलै, २०१५ रोजी आडोशी बोगद्याच्या मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे[संपादन]