पिंपरी चिंचवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिंपरी-चिंचवड या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१८° ३७′ ४०″ N, ७३° ४८′ ४७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५६० मी
जिल्हा पुणे
लोकसंख्या १७,२९,३२० (2011)
महापौर श्री. नितीन काळजे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४११००१
• +०२०
• MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ]
संकेतस्थळ: पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ

पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय ने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ची लोकसंख्या १७ लाख होती.ह्याला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा असेही म्हटले जाते.

भूगोल[संपादन]

पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.

पिंपरी-चिंचवडमधील नद्यांवरचे घाट[संपादन]

  • किवळे घाट
  • पिंपरी झुलेलाल मंदिर घाट
  • थेरगाव पूल घाट
  • थेरगाव बोट क्लब
  • पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट
  • मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट
  • रहाटणी राममंदिर घाट
  • पिंपरी वाघेरे घाट (एक वेगळाच डोंगरी वाघेरे घाट नाशिक-हर्सूल रस्त्त्यावर आहे)
  • वाल्हेकरवाडी घाट
  • सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट
  • पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट
  • पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट
  • काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट
  • कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट
  • थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट
  • पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट
  • सांगवी स्मशानभूमीजवळील घाट
Pcmc building
Pimpri-Chinchwad

पेठा[संपादन]

उपनगरे[संपादन]

सार्वजनिक वाहतूक सेवा[संपादन]

रेल्वे स्थानके : दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी

एस.टी. बस स्थानक: वल्लभनगर एस.टी. बस स्थानक

एस.टी. बस थांबे: चिंचवड स्टेशन, निगडी

पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस स्थानके: निगडी, चिंचवड, भोसरी, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी, आकुर्डी, पिंपळे निलख, किवळे

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बीआरटी मार्ग:

  1. सांगवी फाटा ते मुकई चौक, किवळे (कार्यरत)
  2. नाशिक फाटा ते वाकड फाटा (निर्माणाधीन)
  3. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता (निर्माणाधीन)
  4. दापोडी ते निगडी (कार्यरत)
  5. हिंजवडी ते कोथरुड (निर्माणाधीन)
  6. लोणावळा ते निगडी (निर्माणाधीन)

येथे एक रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहे ज्यामुळे पिंपरी-चिंचवडला नवी ओळख मिळेल व पुर्ण भारताशी शहर रेल्वे वाहतुकीने जोडले जाईल आणि व्यापाराला चालना मिळेल तसेच त्याला पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार स्व.प्रा.रामकृष्ण मोरे,माजी शालेय शिक्षणमंत्री(महाराष्ट्र शासन) ह्यांचे नाव दिले जावे अशी मागणी आहे.[ संदर्भ हवा ]

पुस्तके[संपादन]

पिंपरी चिंचवडची माहिती देणारी फारच थोडी पुस्तके आहेत. त्यांतले हे एक : -

  • पिंपरी-चिंचवड (श्रीकांत चौगुले)
  • उद्योगनगरी (रमाकांत गायकवाड)
  • उपमुख्यमंत्री आणि पिंपरी चिंचवड
  • पिंपरी चिंचवड शहराचा ५० वर्षांचा इतिहास ( विजय जगताप)

पहा: पिंपरी, चिंचवड