Jump to content

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
मैदान माहिती
स्थान पुणे, महाराष्ट्र
स्थापना एप्रिल २०१२
आसनक्षमता ३७,४०६[]
मालक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
आर्किटेक्ट हॉपकिन्स आर्किटेक्ट्स[]
प्रचालक पुणे स्टेडियम लि.
यजमान भारत क्रिकेट संघ
महाराष्ट्र क्रिकेट संघ
पुणे वॉरियर्स (२०१२-१३)
वीर मराठी (२०१३–सद्य)
किंग्स XI पंजाब (२०१५)
रायझिंग पुणे सुपरजायंट्स (२०१६-सद्य)

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २३-२७ फेब्रुवारी २०१७:
भारत  वि. दक्षिण आफ्रिका
अंतिम क.सा. २-६ ऑक्टोबर २०१९:
भारत  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा. १३ ऑक्टोबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. १५ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
प्रथम २०-२० २० डिसेंबर २०१२:
भारत वि. इंग्लंड
अंतिम २०-२० ९ फेब्रुवारी २०१६:
भारत वि. श्रीलंका
शेवटचा बदल १० मार्च २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (जुने नाव: सुब्रता रॉय सहारा स्टेडियम) हे स्टेडियम भारताच्या पुणे शहराजवळील एक क्रिकेट स्टेडियम आहे. पुण्याबाहेरील गहुंजे ह्या गावाजवळ मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गाच्या बाजूला असलेले हे स्टेडियम एप्रिल २०१२ मध्ये बांधले गेले.

पुण्यामधील नेहरू स्टेडियममधील सामन्यांच्या तिकिट वाटपावरून पुणे महानगरपालिकामहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ह्यांदरम्यान भांडणे चालू होती. भारतामधील इंडियन प्रीमियर लीगची वाढती लोकप्रियता लक्षात घेता क्रिकेट असोसिएशनने नवे स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला. ह्या स्टेडियमसाठी पुण्याबाहेर गहुंजे गावाजवळील मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गालगतची जागा निवडण्यात आली. स्टेडियमच्या बांधकामाला ₹ १५० कोटी इतका खर्च आला. १ एप्रिल २००१२ रोजी तत्कालीन आय.सी.सी. अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ह्यांनी नव्या स्टेडियमचे उद्घाटन केले. २०१३ मध्ये सुब्रता रॉयच्या सहारा इंडिया परिवाराने ह्या स्टेडियमचे नामकरण हक्क विकत घेतले व स्टेडियमचे नाव सुब्रता रॉय सहारा स्टेडियम असे ठेवले. सहारा पुणे वॉरियर्स ह्या आय.पी.एल. संघाचे हे गृहमैदान होते.

२०१३ साली पुणे वॉरियर्स संघावर बंदी घालण्यात आल्यामुळे व सहारा परिवार आर्थिक संकटात सापडल्यामुळे ह्या स्टेडियमचा वापर कमी झाला. सहाराकडून करारित मानधन न मिळाल्यामुळे असोसिएशनने ह्या स्टेडियमचे नाव पुन्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असे ठेवले.

२०१५ इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे काही सामने येथे खेळवण्यात आले.

रचना

[संपादन]

या मैदानातील प्रेक्षककक्षाची रचना कोणत्याही बैठकीवरून संपूर्ण मैदानाचा देखावा दिसेल अशी करण्यात आली आहे. या मैदानावर वालुकामय माती पसरवून त्यावर गवत घातलेले आहे. यामुळे कितीही पाउस पडला तरी पाण्याचा निचरा काही मिनिटांतच होतो आणि मैदान पुन्हा खेळण्यास लवकर तयार होते.

बाह्य दुवे

[संपादन]


  1. ^ "भारत-इंग्लंड सामन्याची पुणे स्टेडियमची सर्व तिकीटे संपली".
  2. ^ "एमसीए पुणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट केंद्र". 2018-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.