दौलतमंगळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दौलतमंगळ | |
किल्ले दौलतमंगळ | |
नाव | दौलतमंगळ |
उंची | ४०४० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
जवळचे गाव | पुरंदर,माळशिरस,यवत |
डोंगररांग | भुलेश्वर रांग,सह्याद्रीची उपरांग |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये माळशिरस गावात दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामध्ये आहे.
अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो. या किल्ला व मंदिराविषयीची ऐतिहासिक माहिती असलेले दशरथ यादव यांचे यादवकालीन भुलेश्वर हे संशोधन पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यातून जुना इतिहास उलगडला आहे.
भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामधे आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत.
भौगोलिक स्थान
[संपादन]पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे.
जाण्यासाठी मार्ग
[संपादन]दौलतमंगळ किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग सोयीचे आहेत. पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा गाडीरस्ता आहे. माळशिरस हे लहानसे गाव किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत गावाकडून आहे. यवतच्या दक्षिणेला दौलतमंगळ आहे. दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता आलेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
[संपादन]किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्तित्त्व कसेबसे टिकवून उभे राहीलेले दिसतात. किल्ल्याचा दरवाजा, पायऱ्यांचा मार्ग, पाण्याची टाकी असे वास्तूविशेषही पहायला मिळतात.
किल्ल्याचे भग्नावशेष पाहून आपण निश्चितच खिन्न होतो. खिन्न मनाने आपण भुलेश्वरच्या मंदिरात प्रवेश करतो. मंदिर पाहिल्यावर मनाची उदासिनता कुठल्या कोठे पळून जाते आणि आपण प्रसन्न मनाने मंदिराचे शिल्पकाम न्याहळू लागतो.
मुख्य मंदिराच्या बाहेरून भिंत बांधून मंदिराची सुरक्षितता वाढवल्याचे दिसून येते. मंदिरामधील अनेक मुर्त्यांची तोडफोड केल्याचे दिसते. वरच्या भागातील गिलाव्यामधील मूर्ती मात्र शाबुत असल्याचे पहायला मिळते. कलाकारांची सौंदर्यवृष्टी आणि कलाकारी मनाला भावते तसेच शिल्पांची अदाकारी ही आपल्याला थक्क करते.
परिसर
[संपादन]भुलेश्वर परिसरातून वज्रगड, पुरंदर, सिंहगड किल्ले दिसतात. तसेच जेजुरी, ढवळेश्वर आणि सपाटीवरचा विस्तृत प्रदेशही पहाता येतो. दौलतमंगळाच्या भेटीत आपण जेजुरी अथवा ढवळेश्वरालाही भेट देवू शकतो.
गडावरील राहायची सोय
[संपादन]गडावरील खाण्याची सोय
[संपादन]गडावरील पाण्याची सोय
[संपादन]गडावर जाण्याच्या वाटा
[संपादन]मार्ग
[संपादन]जाण्यासाठी लागणारा वेळ
[संपादन]संदर्भ
[संपादन]- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
- किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर
- गडदर्शन - प्र. के. घाणेकर
- गड आणि कोट - प्र. के. घाणेकर
- इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
- चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
- साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
- सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर
- मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर
- दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर
- गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर
हे सुद्धा पहा
[संपादन]