Jump to content

यवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यवत हे दौंड तालुक्यातील गाव असून, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. माळशिरस-भुलेश्वर पासून हे गाव ११ किलोमीटर अंतरावर आहे. आठवडा बाजाराचे गाव असून दर शुक्रवारी येथे बाजार भरतो.व या गावामधील प्रसिद्ध देवस्थान म्हणून श्रीकाळभैरवनाथ व लक्ष्मीआईचे मंदिर जिल्हाप्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात भुलेश्वरला भाविक भेट देतात . हे मंदिर दगडी बांधकामातील असून दगडावरील कोरीवकाम अत्यंत उत्तम असे आहे पावसाळ्यात या डोंगरावरून परिसर खूपच सुंदर दिसतो .यवत या गावात पोलीस स्टेशन आहे . यवत हा तसा ग्रामीण भाग आहे. पण या गावातून पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्यमुळे या गावाचा चांगला विकास झालेला दिसतो .या गावात इंगजी माध्यमाची शाळा आहे. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]