फलटण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?फलटण
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

१७° ५८′ ४८″ N, ७४° २५′ ४८″ E

गुणक: 17°58′48″N 74°25′48″E / 17.98°N 74.43°E / 17.98; 74.43
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील फलटण
पंचायत समिती फलटण

गुणक: 17°58′48″N 74°25′48″E / 17.98°N 74.43°E / 17.98; 74.43


फलटण
जिल्हा सातारा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ६२,०००
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२१६६
टपाल संकेतांक ४१५ ५२३
वाहन संकेतांक MH-११

फलटण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका व शहर आहे.

बाणगंगा नावाची एक नदी फलटण गावातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसऱ्या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे असते. पुण्याहून फलटणला जाताना आधी मलठण लागते.

फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटण येथील पुरातन जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.

फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजा होते.

{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

१७° ५८′ ४८″ N, ७४° २५′ ४८″ E

कारखाने[संपादन]

तालुक्यातील पेठा[संपादन]

 1. मंगळवार पेठ :

दर वर्षी अक्षय्य तृतीयेला नाथाच्या काठीचा उत्सव असतो.

 1. सोमवार पेठ :

दर वर्षी वैशाख पौर्णिमेला येथे फिरंगाई देवीची जत्रा असते.

मनोरंजन[संपादन]

 1. इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन
 2. नामवैभव (सिटी प्राईड)चित्रपटगृह

 • शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई ह्या फलटण संस्थानिक नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या.
 • फलटण शब्दाची उत्पत्ती फल उत्तन (अर्थात फळबागांचा प्रदेश) अशी असावी, असे म्हटले जाते. फलटण क्षेत्रातील धुमाळवाडी आणि दक्षिण पट्ट्यातील डाळिंबे जगभरात निर्यात होतात.
 • फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू जतन केल्या आहेत. कैक चित्रपट / दूरचित्रवाणी मालिका ह्यांचे चित्रीकरण आजही ह्या वास्तूंमध्ये होत असते.
 • फलटणचा ग्रामीण भाग कृषी क्षेत्रात प्रगत असून नीरा डावा कालवा सिंचन योजना ही तेथील कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरली आहे..
 • मराठी फिल्मसृष्टीत नावलौकिक मिळवणारा फलटणकरांचा "बिरोबा फिल्म्स" निर्मित "होऊ दे जरासा उशीर " नावाचा चित्रपट ऑस्करच्या जागतिक फिल्म्स फेस्टिव्हलला पाठवला गेला होता.

फलटण तालुक्यातली गावे[संपादन]

ढवळ - हे गाव पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते

हिंगणगाव

हिंगणगाव-हे भैरवनाथाचे गाव आहे.

आसू, उपळवे, कापशी, गोखळी, ढवळ, तरडगाव, तरडफ, दालवडी, निंभोरे, पवारवाडी, पाडेगाव, फरांदवाडी, बरड, भीमनगर, मिरगाव, राजाळे, वाखरी, वाठार निंबाळकर, विडणी, साखरवाडी, सांगवी, सासवड, सोनगाव, हिंगणगाव, वगैरे.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

 1. प्राचार्य शिवाजीराव भोसले
 2. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर

वाहतूक[संपादन]

Satara.gif

फलटण हे साताऱ्यापासून सुमारे ६५ कि.मी. तर पुण्यापासून सुमारे ११० कि.मी दूर आहे. पुण्याहून सासवड - जेजुरी - निरा - लोणंद या मार्गे तसेच साताऱ्याहून वडुथ - वाठार(रेल्वे स्टेशन)- आदर्की या मार्गे फलटणला बसने जाता येते. फलटणला जाण्यासाठी वरील दोन्ही ठिकाणांवरुन राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची चांगली सोय आहे.

वैशिष्ट्ये[संपादन]

१.विमाने उतरण्यासाथी फलटणला एक धावपट्टी आहे. तिच्यावर छोटे विमान उतरू शकते. या शहराच्या बाजूला धुमाळवाडी येथे धबधबा आहे.

२.छत्रपती शंभुराजेच्या मातोश्री श्रीमंत महाराणी सईबाई साहेब यांचं जन्मस्थान.

बाह्य दुवे[संपादन]

निंबकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट [१][मृत दुवा]

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा | कराड | वाई | महाबळेश्वर | फलटण | माण | खटाव | कोरेगांव | पाटण | जावळी | खंडाळा