"रघुनाथराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ५२: ओळ ५२:
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७८२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १७८२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

०८:४९, २३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

रघुनाथराव बाजीराव
ब्रिटिश चित्रकार जेम्स फोर्ब्स याने रेखलेले रघुनाथरावाचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स. १८१३)
पूर्ण नाव रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
जन्म डिसेंबर १६, इ.स. १७२१
मृत्यू इ.स. १७८२
पूर्वाधिकारी माधवराव
उत्तराधिकारी सवाई माधवराव
वडील बाजीराव बल्लाळ
आई काशीबाई
पत्नी आनंदीबाई
संतती अमृतराव, बाजीराव (दुसरा)

रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (डिसेंबर १६, इ.स. १७२१ - इ.स. १७८२) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.

पेशवाईसाठी प्रयत्न

नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बर्‍याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.