Jump to content

मोरेश्वर नीळकंठ पिंगळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोरेश्वर पिंगळे या पानावरून पुनर्निर्देशित)
मोरेश्वर नीळकंठ पिंगळे
जन्म डिसेंबर ३०, इ.स. १९१९
जबलपूर, मध्य प्रदेश, भारत
मृत्यू सप्टेंबर २१, इ.स. २००३
नागपूर, महाराष्ट्र, भारत
टोपणनावे भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण कलास्नातक
प्रशिक्षणसंस्था मॉरिस कॉलेज, नागपूर
धर्म हिंदू


मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते होते. "हिन्दु जागरणाचा सरसेनानी" म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. संघ प्रचारक म्हणून झालेल्या त्यांच्या ६५ वर्षांच्या सेवेत, त्यांनी विविध पदे भूषविली. त्यातील, 'अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख' हे पद सर्वोच्च होते. सन १९७५ मध्ये भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सहा सरसंघचालकांपैकी एक होते. भारतीय प्रसारमाध्यमांनी, रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान त्यांचा "फील्ड मार्शल" म्हणून गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले: गौ-संशोधन, सरस्वती नदी शोध, इतिहास पुनर्लेखन ही त्यातील काही उदाहरणे. त्यामुळे त्यांना संघाचा प्रकल्प पुरुष ही पदवी मिळाली. ते प्रसिद्धिपराङ्‌मुख होते. त्यांचे वर्णन 'सर्वच ठिकाणी पण कशातच नाही' असे करता येऊ शकेल. ते आपले जीवन संघाचा खरा स्वयंसेवक म्हणून जगले.

शिक्षण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कामगिरी

[संपादन]

मोरोपंत हे डॉ. हेडगेवार व श्री गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळालेल्यांपैकी एक आहेत. सन १९४१ मध्ये पदवी घेतल्यानंतर ते सन १९४६ मध्ये पूर्ण वेळ संघ प्रचारक झाले. १९४६ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी त्यांना महाराष्ट्राचे सहप्रांतप्रचारक म्हणुन नियुक्ती मिळाली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येत ’सरसंघचालक गुरुजी गोळवलकर यांचा हात असल्याच्या अफवां’मुळे पडलेली संघाच्या विविध शाखांमधील दरी बुजविण्याचे कार्य केले.

प्रथम एकात्मता यात्रा

[संपादन]

सन १९८१ मध्ये मीनाक्षीपुरम् येथे शेकडो हिंदूंना बाटवले गेले. असे पुन्हा होऊ नये त्यासाठी पिंगळे यांनी १९८३ साली विश्व हिंदू परिषदेद्वारे एकात्मता यात्रेची मुहूर्तमेढ रोवली..[] त्यांच्या संघटना कौशल्यामुळे मोरोपंतांना या यात्रेचे नियोजन, परस्पर समन्वय व क्रियान्वयनाची जबाबदारी दिली गेली. या कामासाठी मोरोपंत भारतभर फिरले. एकात्मता यात्रेच्या रथाच्या त्यांनी निवडलेल्या परिणामकारक मार्गामुळे त्या यात्रेचा प्रभाव निश्चित वाढला.

राम-जानकी रथ यात्रा

[संपादन]

सन १९८३ मध्ये झालेल्या एकात्मता यात्रेपाठोपाठच, राम-जानकी रथयात्रा काढण्यात आली.ही राम जन्मभूमी आंदोलनाची पूर्वतयारी होती.या यात्रेचा उद्देश, हिंदूंना संघटित करणे तसेच त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना जागृत करणे, हा होता. बिहारउत्तर प्रदेश या प्रांतांमधून सात रथ प्रवास करत करत अयोध्येला पोचले. या रथांमध्ये भगवान श्रीराम हे अयोध्येत तुरुंगात आहेत असे दाखविण्यात आले होत. मोरोपंतांना या यात्रेचे संयोजक व नियंत्रक म्हणून नेमण्यात आले होते. सन १९८६ मध्ये, फैजाबाद न्यायालयाने हिंदू समाजाची जागरूकता जाणून घेऊन अयोध्येतील राममंदिराचे कुलूप काढण्याचा आदेश दिला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "एकात्मता यात्रा [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2009-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-12-19 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]