Jump to content

जेम्स फोर्ब्स (चित्रकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स फोर्ब्स याने चितारलेले चित्त्याच्या सहाय्याने शिकार चित्र : स्थळ - दक्षिण गुजरात, भारत; ओरिएंटल मेम्वार ग्रंथातून, इ.स. १८१२.

जेम्स फोर्ब्स (इंग्लिश: James Forbes) (इ.स. १७४९; लंडन, इंग्लंड - इ.स. १८१९) हा ब्रिटिश चित्रकार व इंग्लिश भाषेतील लेखक होता.

जीवन[संपादन]

जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स १७६४ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनी शासनाच्या मुंबई किल्ल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स १७८४ साली जेम्स इंग्लंडला परत गेला. तो कायम मुलकी पेशात राहिला.

भारतातील कारकीर्द[संपादन]

त्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बऱ्याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्या सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, त्याला मराठी सैन्य जवळून बघता आले. या काळातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा यांबद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे.

योगदान[संपादन]

जेम्स फोर्ब्स इ.स. १७८० साली भारत सोडून ब्रिटनमधे राहायला गेले. मात्र त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी त्यांच्या ओरिएण्टल मेमरीज ग्रंथाचे खंड इ.स. १८१३ मध्ये प्रसिद्ध झाले. अठराव्या शतकातील जीवन चितारणारे हे ग्रंथ बहुमोल ठरतात. या खंडामधे त्या वेळच्या माणूस आणि वन्यप्राण्यात यांच्यात झालेल्या चकमकी यांचं वर्णन आहे.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "फोर्ब्स - ओरिएंटल मेम्वार : पुस्तकाबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)