Jump to content

अटक (पंजाब)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अटक, पंजाब या पानावरून पुनर्निर्देशित)

अटक (पंजाबी, उर्दू: اٹک) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर अटक जिल्हा आणि तहसीलाचे प्रशासकीय केन्द्र आहे.

१९०१मध्ये २,८६६ लोकसंख्या असलेल्या अटकची लोकसंख्या १९९८मध्ये सुमारे १,००,००० होती.

पाकिस्तानी वायुसेनेचा कामरा वायुसेना तळ येथून जवळ आहे.

इतिहास

[संपादन]

सिंधु नदीकाठी असलेल्या या शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. मोगल सम्राट अकबर याने खवाजा शमसुद्दीन खवाफी याला येथे किल्ला बांधण्याचे फर्मावल्यावर १५८३मध्ये येथील किल्ला बांधून पूर्ण झाला.[] १९०८मध्ये मूळ गावाजवळ कॅम्पबेलपूर नावाने याची पुनर्रचना झाली.[][] रघुनाथराव पेशवे आणि तुकोजी होळकर यांनी २८ एप्रिल, १७५८ रोजी हा किल्ला काबीज केला. मराठा साम्राज्याची उत्तरेकडील ही सर्वदूरची सीमा समजली जाते. इंग्रजांनी हा किल्ला १८४९मध्ये घेतला व शहराचे नाव बदलून कॅम्पबेलपूर ठेवले. १९७८मध्ये पाकिस्तान सरकारने ते बदलून परत अटक असे केले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Everett-Heath, John (2017-12-07). The Concise Dictionary of World Place Names (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780192556462.
  2. ^ Shackle, Christopher (1980). "Hindko in Kohat and Peshawar". Bulletin of the School of Oriental and African Studies. 43 (3): 482. doi:10.1017/S0041977X00137401. ISSN 0041-977X.CS1 maint: ref=harv (link)
  3. ^ Everett-Heath, John (2017-12-07). The Concise Dictionary of World Place Names (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780192556462.