श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२ | |||||
भारत | श्रीलंका | ||||
तारीख | २४ फेब्रुवारी – १६ मार्च २०२२ | ||||
संघनायक | रोहित शर्मा | दिमुथ करुणारत्ने (कसोटी) दासून शनाका (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रविंद्र जडेजा (२०१) | दिमुथ करुणारत्ने (१६६) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (१२) | लसिथ एम्बलडेनिया (८) | |||
मालिकावीर | ऋषभ पंत (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | श्रेयस अय्यर (२०४) | दासून शनाका (१२४) | |||
सर्वाधिक बळी | भुवनेश्वर कुमार (३) | लाहिरु कुमार (५) | |||
मालिकावीर | श्रेयस अय्यर (भारत) |
श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले. जानेवारी मध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी२० मालिका कसोटी मालिकेपूर्वी खेळवण्यात यावी अशी विनंती बीसीसीआयकडे केली. त्यानुसार बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जारी केले ज्यात ट्वेंटी२० मालिका फेब्रुवारीपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले. बंगळूर येथील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र खेळवण्यात आली.
भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. पहिल्या कसोटीसाठी ५०% प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली. मोहाली येथील पहिला कसोटी सामना हा विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना होता. रविंद्र जडेजा याच्या नाबाद १७५ धावांच्या आणि ९ गडी मिळवून केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने पहिला कसोटी सामना १ डाव आणि २२२ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली. बंगळूर येथील दुसरी कसोटीत २३८ धावांनी विजय मिळवत भारताने कसोटी मालिका २-० ने जिंकली. दौऱ्यानंतर श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज सुरंगा लकमल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- श्रीलंकेचा हा ३००वा कसोटी सामना होता.
- भारताचा कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माचा पहिला कसोटी सामना.
- विराट कोहली (भा) १०० कसोटी सामने खेळणारा १२वा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - १२, श्रीलंका - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- भारत आणि श्रीलंकेमधील पहिला वहिला दिवस/रात्र कसोटी सामना.
- सुरंगा लकमल (श्री) याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - १२, श्रीलंका - ०.
श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२० |