रोहित शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

{{माहितीचौकट क्रिकेटपटू माहिती | flag = Flag of India.svg | nationality = भारत | देश= भारत | देश_इंग्लिश_नाव = India| देश abbrev = IND | नाव = रोहित शर्मा | image = Rohit Sharma.jpg | संपूर्ण नाव = रोहित गुरुनाथ शर्मा | जन्म = ३० एप्रिल १९८७ | उंची = ५ फुट ९ इंच १.७५ मीटर | भूमिका = फलंदाज | फलंदाजीची पद्धत = उजव्या हाताने | गोलंदाजीची पद्धत = उजव्या हाताने ऑफब्रेक|

सामने = -२१ धावा = -११८४ फलंदाजीची सरासरी =३७.०० शतके/अर्धशतके =२/७ सर्वोच्च धावसंख्या =१७७ चेंडू = ३३४ बळी = २ गोलंदाजीची सरासरी =१०१.०० ५ बळी =० १० बळी = ० सर्वोत्तम गोलंदाजी =१/२६ झेल/यष्टीचीत =८/- सामने =१४८ धावा = ५१३१ फलंदाजीची सरासरी=४१.३७ शतके/अर्धशतके=१०/२९ सर्वोच्च धावसंख्या=२६४ चेंडू=५९३ बळी=२ गोलंदाजीची सरासरी=६४.३७ ५ बळी=० ODI १०s =० सर्वोत्तम गोलंदाजी२ =२/२७ झेल/यष्टीचीत२ =३८/-

रोहित गुरुनाथ शर्मा (एप्रिल ३०, १९८७, नागपूर, महाराष्ट्र - ) हा भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज असून अधूनमधून तोच उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. तो इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. त्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. इ.स. २०१३ मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली. त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१३ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १७७ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १११ धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले.त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.याच सामन्यात रोहितने एकाच सामन्यात सर्वाधिक १६ षटकार मारण्याच विश्वविक्रम देखील आपल्या नावावर केला.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.