Jump to content

नाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेट मध्ये जर एखादा फलंदाज एका डावात फलंदाजी करायला आला व तो डाव संपेपर्यंत बाद झाला नाही तर तो फलंदाज नाबाद राहिला असे म्हणतात. फलंदाज डाव चालू असताना, फलंदाजी करते वेळी नाबाद आहे असे म्हणतात.

एखादा फलंदाज नाबाद आहे असे दर्शविण्यासाठी त्याच्या वैयक्तिक धाव्संख्येसमोर एक चांदणी (*) लिहिली जाते. उदा: सचिन तेंडुलकर १२०* व हे सचिन तेंडुलकर १२० धावा, नाबाद असे वाचले जाते.