Jump to content

२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलेशिया क्रिकेट संघ आणि पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी मालिका खेळण्यासाठी मार्च व एप्रिल २०२२ दरम्यान नेपाळचा दौरा केला. तिरंगी मालिकेपूर्वी पापुआ न्यू गिनीने यजमान नेपाळसमवेत दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. १२ मार्च २०२२ रोजी नेपाळ क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले. सर्व सामने हे किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर खेळविले गेले.

नेपाळ वि. पापुआ न्यू गिनी द्विपक्षीय मालिका

[संपादन]
पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा, २०२१-२२
नेपाळ
पापुआ न्यू गिनी
तारीख २५ – २६ मार्च
संघनायक संदीप लामिछाने आसाद वल्ला
एकदिवसीय मालिका
निकाल पापुआ न्यू गिनी संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा रोहित कुमार (१६१) चार्ल्स अमिनी (११२)
सर्वाधिक बळी सोमपाल कामी (५) नॉर्मन व्हानुआ (५)
मालिकावीर चार्ल्स अमिनी (पापुआ न्यू गिनी)

द्विपक्षीय मालिकेतील दोन्ही सामने २५ आणि २६ मार्च २०२२ रोजी खेळविण्यात आले. सर्व सामने किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले. हा पापुआ न्यू गिनीचा पहिला नेपाळ दौरा होता. पापुआ न्यू गिनीने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.

पापुआ न्यू गिनीने २०१५ नंतर प्रथमच द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२५ मार्च २०२२
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२९२/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२८६/८ (५० षटके)
रोहित कुमार १२६ (१०७)
नॉर्मन व्हानुआ ३/६२ (१० षटके)
पापुआ न्यू गिनी ६ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: दुर्गा सुबेदी (ने) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: चार्ल्स अमिनी (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • पापुआ न्यू गिनीने नेपाळमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • पापुआ न्यू गिनीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेपाळवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • देव खनाल (ने) आणि सिमो कमिआ (पा.न्यू.गि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
२६ मार्च २०२२
०९:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२७८/८ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२८३/७ (४८.४ षटके)
दिपेंद्र सिंग ऐरी १०५ (१४०)
आले नाओ ३/४८ (९ षटके)
लेगा सियाका ९० (१०२)
सोमपाल कामी ३/३८ (९ षटके)
पापुआ न्यू गिनी ३ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: विनय कुमार झा (ने) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: लेगा सियाका (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.

तिरंगी मालिका

[संपादन]
२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका
दिनांक २८ मार्च - ४ एप्रिल २०२२
स्थळ नेपाळ नेपाळ
निकाल नेपाळचा ध्वज नेपाळने तिरंगी मालिका जिंकली.
मालिकावीर नेपाळ दिपेंद्र सिंग ऐरी
संघ
मलेशियाचा ध्वज मलेशिया नेपाळचा ध्वज नेपाळ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
संघनायक
अहमद फियाज संदीप लामिछाने आसाद वल्ला
सर्वात जास्त धावा
अहमद फियाज (१७६) दिपेंद्र सिंग ऐरी (२५५) टोनी उरा (१९०)
सर्वात जास्त बळी
पवनदीप सिंग (६)‌ करण के.सी. (१३) कबुआ मोरिया (८)

२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका ही नेपाळमध्ये २८ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान नेपाळसह पापुआ न्यू गिनी आणि मलेशिया ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व सामने हे किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर खेळविले गेले.

गट फेरीचे चारही सामने जिंकत नेपाळने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. पापुआ न्यू गिनी आणि मलेशिया या दोन्ही देशांनी प्रत्येकी १ सामना जिंकला. त्यामुळे निव्वळ धावगतीच्या जोरावर पापुआ न्यू गिनी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात पापुआ न्यू गिनीचा ५० धावांनी पराभव करत नेपाळने तिरंगी मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]

प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी दोन-दोन सामने खेळले. गट फेरीच्या शेवटी गुणफलकातील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात जेतेपदासाठी खेळले.

संघ
खे वि गुण धावगती पात्रता
नेपाळचा ध्वज नेपाळ २.५३० अंतिम सामन्यासाठी पात्र
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -०.४६७
मलेशियाचा ध्वज मलेशिया -२.०९४

गट फेरी

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२८ मार्च २०२२
१२:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१८३/९ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६८ (१९.२ षटके)
आरिफ शेख ४३ (३५‌)
चॅड सोपर २/२४ (४ षटके)
नेपाळ १५ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: विनय कुमार झा (ने) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: संदीप लामिछाने (नेपाळ)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • पापुआ न्यू गिनीने नेपाळमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • नेपाळने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


२रा सामना

[संपादन]
२९ मार्च २०२२
१२:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१८०/३ (२० षटके‌)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१७२ (१९.३ षटके)
टोनी उरा ५६ (३५)
शर्विन मुनियांदी ४/३२ (३.३ षटके‌)
मलेशिया ८ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: विनय कुमार झा (ने) आणि दुर्गा सुबेदी (ने)
सामनावीर: शर्विन मुनियांदी (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • मलेशिया आणि पापुआ न्यू गिनी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलेशियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अम्मर झुह्दी हझलन आणि विजय उन्नी (म) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

[संपादन]
३० मार्च २०२२
१२:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
११४/८ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
११७/४ (१३.४ षटके)
झुबैदी झुल्फीके ३२ (१५)
करण के.सी. २/१६ (३ षटके)
आसिफ शेख ५७ (३८)
पवनदीप सिंग २/२३ (३ षटके)
नेपाळ ६ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि दुर्गा सुबेदी (ने)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • दिलीप नाथ (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना

[संपादन]
३१ मार्च २०२२
१२:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२०३/७ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६६ (१९.४ षटके)
चार्ल्स अमिनी ६२ (४७)
करण के.सी. ५/२१ (३.४ षटके)
नेपाळ ३७ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: विनय कुमार झा (ने) आणि दुर्गा सुबेदी (ने)
सामनावीर: करण के.सी. (नेपाळ)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • मोहम्मद आदिल आलम (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


५वा सामना

[संपादन]
१ एप्रिल २०२२
१२:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१९६/६ (२० षटके‌)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१९९/२ (१७.५ षटके)
सय्यद अझीज ६४ (३५)
कबुआ मोरिया ४/२९ (३ षटके)
टोनी उरा ८६* (३४)
मुहम्मद वफीक १/३४ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ८ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: विनय कुमार झा (ने) आणि दुर्गा सुबेदी (ने)
सामनावीर: टोनी उरा (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • पापुआ न्यू गिनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये मलेशियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • सिमो कमिआ (पा.न्यू.गि.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

६वा सामना

[संपादन]
२ एप्रिल २०२२
१२:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२२३/४ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१३८ (१९.५ षटके)
नेपाळ ८५ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि दुर्गा सुबेदी (ने)
सामनावीर: दिपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ)
  • नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना

[संपादन]
४ एप्रिल २०२२
१२:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१६८/६ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
११८ (१६.१ षटके)
सेसे बाउ ५९ (३८)
दिपेंद्र सिंग ऐरी ४/१८ (४ षटके)
नेपाळ ५० धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: विनय कुमार झा (ने) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: दिपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.