वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९८३-८४ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १३ ऑक्टोबर – २९ डिसेंबर १९८३ | ||||
संघनायक | कपिल देव | क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ६-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुनील गावसकर (५०५) | क्लाइव्ह लॉईड (४९७) | |||
सर्वाधिक बळी | कपिल देव (२९) | माल्कम मार्शल (३३) | |||
मालिकावीर | कपिल देव (भारत) आणि माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर - डिसेंबर १९८३ दरम्यान सहा कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. त्याच वर्षी जून १९८३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अनपेक्षितपणे भारताने वेस्ट इंडीजचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घ्यायचा ह्या मानसिकतेने आणि तयारीनिशी वेस्ट इंडीज संघ भारतात खेळायला उतरला. भारतात वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच एकदिवसीय सामने खेळले. भारताच्या भूमीवर पहिल्यांदाच पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळविण्यात आली.
भारताला या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. जरी भारताची कामगिरी म्हणावी तशी चांगली नव्हती तरी या दौऱ्यात अनेक विक्रम मोडले गेले. अनेक खेळाडू निवृत्त झाले तर अनेक नवोदित खेळाडूंनी पदार्पणे केली. भारतीय कर्णधार कपिल देव याने कसोटीच्या एका डावात ८३ धावा देऊन ९ गडी बाद करून त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीत विक्रम केला. ५व्या कसोटीत भारताचे फलंदाज सुनील गावसकर यांनी अत्यंत खराब कामगिरी केल्याने चिडलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. परंतु ६व्या आणि अखेरच्या कसोटीत सुनील गावसकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च नाबाद २३६ धावा केल्या. सुनील गावसकर यांनी नाबाद २३६ धावा करून ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांचा विक्रम मोडला आणि भारतीय फलंदाज आणि माजी विनू मांकड यांची भारतीय फलंदाजातर्फे कसोटीत केलेली सर्वोच्च २३१ धावांचा विक्रम मोडला. कसोटीत खराब कामगिरी आणि ढेपाळलेली मानसिकता पाहून देशभर संघाविरोधात आंदोलने झाली. काही आंदोलकांद्वारे चालू कसोटीत घुसून खेळपट्टी खोदण्याचाही वादग्रस्त प्रकार घडला. ६व्या कसोटीत वेस्ट इंडियन खेळाडू विन्स्टन डेव्हिस याच्यावर काही संतप्त प्रेक्षकांनी दगडफेक केली. ही घटना घडताच कर्णधार क्लाइव्ह लॉईड आणि उर्वरीत वेस्ट इंडीजने खेळ थांबवला. त्यानंतर पूर्ण वेस्ट इंडीज संघाच्या सुरक्षेची जवाबदारी तत्कालिन मद्रास प्रांताचे राज्यपाल सुंदरलाल खुराणा यांनी घेतल्यावरच वेस्ट इंडीजने मालिका सुरू ठेवली. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिका पाहुण्या वेस्ट इंडीजने अनुक्रमे ३-० आणि ५-० अश्या पद्धतीने जिंकल्या.
अँडी रॉबर्ट्स आणि यशपाल शर्मा हे दोघे महान खेळाडू या मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्त झाले. तर अनेक नवोदित खेळाडू - रिची रिचर्डसन, चेतन शर्मा, नवज्योतसिंग सिद्धू आणि राजू कुलकर्णी या पुढे प्रसिद्धी मिळवलेल्या क्रिकेटपटुंनी या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]दोन-दिवसीय सामना:भारत २२ वर्षांखालील वि वेस्ट इंडीज
[संपादन]४५ षटकांचा सामना:भारत XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १३ ऑक्टोबर १९८३
धावफलक |
वि
|
||
डेसमंड हेन्स ५५* (८८)
|
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पहिल्यांदा पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला होता. परंतु वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान २२.४ षटकांनंतर सामना रद्द करण्यात आला.
- भारतातला वेस्ट इंडीजचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- एल्डिन बॅप्टिस्ट आणि रॉजर हार्पर (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] ९ नोव्हेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन] ७ डिसेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
- चेतन शर्मा (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन] १७ डिसेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
- राजू कुलकर्णी (भा) आणि रिची रिचर्डसन (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२१-२५ ऑक्टोबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- एल्डिन बॅप्टिस्ट (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]१२-१६ नोव्हेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- नवज्योतसिंग सिद्धू (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
४थी कसोटी
[संपादन]२४-२९ नोव्हेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- रिची रिचर्डसन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
[संपादन]६वी कसोटी
[संपादन]
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |