आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३चे यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे.[१] विश्वचषक स्पर्धेचे ही १३वी आवृत्ती असणार आहे, आणि भारतात स्पर्धा होण्याची ही ४थी वेळ आहे. २०२३ मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा फक्त भारतात होईल. या आधी भारताने १९८७ (पाकिस्तान सोबत), १९९६ (पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत) आणि २०११ (श्रीलंका आणि बांगलादेशसोबत) ह्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.