युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२
युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२ | |||||
नामिबिया | युगांडा | ||||
तारीख | ८ – १० एप्रिल २०२२ | ||||
संघनायक | गेरहार्ड इरास्मुस | ब्रायन मसाबा | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नामिबिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गेरहार्ड इरास्मुस (१३१) | दिनेश नाकराणी (१२९) | |||
सर्वाधिक बळी | जेजे स्मिट (८) | रियाजत अली शाह (२) दिनेश नाकराणी (२) |
युगांडा क्रिकेट संघाने एप्रिल २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन अनौपचारिक एकदिवसीय सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक मधील युनायटेड क्रिकेट मैदानावर झाले. युगांडाने यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये नामिबियाचा दौरा केला होता ज्यात नामिबियाने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली होती. अनौपचारिक एकदिवसीय सामने नामिबिया अ संघाविरुद्ध झाले.
नामिबियाने पहिला सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात कर्णधार गेरहार्ड इरास्मुसने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर १७७ धावांपर्यंत मजल मारली. परंतु युगांडन फलंदाज दिनेश नाकराणीने केलेल्या उत्तम फलंदाजीच्या जोरावर अनपेक्षितरित्या युगांडाने दुसरा ट्वेंटी२० सामना ७ गडी राखून जिंकत मालिका १़-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवला. मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात पुनरागमन करून विजय मिळवत नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात नामिबियन गोलंदाज जेजे स्मिट याने हॅट्रीक घेतली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात हॅट्रीक घेणारा तो नामिबियाचा पहिला खेळाडू ठरला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
सायमन सेसेझी ५४ (५४)
जेजे स्मिट २/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
- डायलन लीचर (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
- युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
जेजे स्मिट ७१ (३५)
कॉसमॉस क्येवुटा १/१८ (४ षटके) |
सायमन सेसेझी ५८ (४७) जेजे स्मिट ६/१० (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
- जुमा मियाजी (यु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.