ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १६ फेब्रुवारी – २९ मार्च २०१७ | ||||
संघनायक | विराट कोहली | स्टीव्ह स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चेतेश्वर पुजारा (४०५) | स्टीव्ह स्मिथ (४९९) | |||
सर्वाधिक बळी | रवींद्र जडेजा (२५) | स्टीव्ह ओ'कीफे (१०) नेथन ल्योन (१०) | |||
मालिकावीर | रवींद्र जडेजा (भा) |
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.[१][२][३] भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.[४] ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम केला.[५]
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दौऱ्याच्या तारखा ऑक्टोबर २०१६ मध्ये जाहीर केल्या.[६] बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत डीआरएस वापरण्याची ही पहिलीच वेळ.[७] ॲडलेड येथील श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पुण्यातील पहिली कसोटी खेळला.[८]
संघ
[संपादन]भारत[९] | ऑस्ट्रेलिया[१०] |
---|---|
- दुसऱ्या कसोटी दरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे मिचेल मार्शला (ऑ) उर्वरित मालिकेमधून वगळण्यात आले आणि त्याच्याऐवजी मार्कस स्टोइनिसची निवड करण्यात आली.[११]
- खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्याला (भा) शेवटच्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले.[१२]
- पायाच्या दुखापतीमुळे मिचेल स्टार्कला (ऑ) शेवटच्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले.[१३] त्याच्याऐवजी पॅट कमिन्सला संघात स्थान देण्यात आले.[१४]
- विराट कोहलीच्या खांद्याला दुखापतझाल्याने चवथ्या कसोटीआधी, त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान दिले गेले.[१५]
सराव सामना
[संपादन]प्रथम श्रेणी: भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया
[संपादन]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२३-२७ फेब्रुवारी २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ह्या मैदानावरील ही पहिलीच कसोटी.[८]
- १०५ ही भारताचा भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या आहे.
- मिचेल स्टार्कच्या (ऑ) १,००० कसोटी धावा पूर्ण.[१६]
- रविचंद्रन अश्विनने (भा) कपिल देवचा भारतातील मोसमातील सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम मोडला.[१७]
- स्टीव्ह ओ'कीफेने (ऑ) कसोटीमध्ये पहिल्यांदाच ५-बळी घेण्याची कामगिरी कामगिरी केली.[१८] त्याने पाच गडी १९ चेंडूंमध्ये बाद केले आणि भारताविरुद्ध सर्वात कमी चेंडूंमध्ये पाच गडी बाद करण्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.[१९]
- भारताचे शेवटचे सात गडी अवघ्या ११ धावांत बाद झाले, ही कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात वाईट कामगिरी.[१९]
- स्टीव्ह ओ'कीफेची सामन्यातील ७० धावांत १२ बळींची कामगिरी ही भारतातील कसोटीमध्ये परदेशी फिरकी गोलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी तसेच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची भारताविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[२०]
- २००४ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा आणि २०१२ नंतर कोणत्याही संघाचा भारतातील पहिला विजय.[२०]
२री कसोटी
[संपादन]४-८ मार्च २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- नेथन ल्योनने (ऑ) परदेशी खेळाडूतर्फे भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.[२१]
- ऑस्ट्रेलियातर्फे नेथन ल्योन हा भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज (५८ बळी), आणि भारताविरुद्ध तीनवेळा सात-गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज.[२१]
- चार वेगवेगळ्या गोलंदाजांनी एका डावात प्रत्येकी ६ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ.[२२]
- रविचंद्रन अश्विनने (भा) सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये (४७) २५ वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.[२२]
३री कसोटी
[संपादन]१६-२० मार्च २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ह्या मैदानावरील हा पहिला कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियाचा ८००वा कसोटी सामना.[२३]
- मुरली विजयचा (भा) ५०वा कसोटी सामना.[२३]
- ५,००० कसोटी धावा पूर्ण करणारा स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात लहान खेळाडू. तसेच त्याची ही कामगिरी ऑस्ट्रेलियातर्फे तिसरी सर्वात जलद आहे.[२४]
- ग्लेन मॅक्सवेलचे (ऑ) पहिले कसोटी शतक. तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये शतक करणारा तो ऑस्ट्रेलियातर्फे दुसरा आणि जगातील तेरावा फलंदाज.[२५]
- स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल दरम्यानची १९१ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाची ५व्या गड्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट भागीदारी आणि ५व्या गड्यासाठी पाहुण्या संघातर्फे भारतातील ४थी सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२६]
- स्टीव्ह स्मिथ च्या नाबाद १७८ धावा ह्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारातर्फे सर्वोत्कृष्ट खेळी तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची भारतातील तिसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी.[२६]
- चेतेश्वर पुजाराने (भा) ५२५ चेंडूंचा सामना करताना २०२ धावा केल्या, भारतीय फलंदाजातर्फे चेंडूचा विचार करता कसोटीमधील ही सर्वात मोठी खेळी आहे.[२७]
- पुजारा आणि वृद्धिमान साहा यांची १९९ धावांची भागीदारी ही भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी आहे.[२७]
४थी कसोटी
[संपादन]२५-२९ मार्च २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: कुलदीप यादव (भा).
- ह्या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना.[२८]
- अजिंक्य रहाणेचा भारताचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[२९]
- स्टीव्ह स्मिथ हा भारतातील मालिकेमध्ये तीन शतके करणारा पहिला ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज.[३०]
- २०१६-१७ मध्ये ७९ बळींसह रविचंद्रन अश्विन (भा) हा एका मोसमात सर्वाधित गडी बाद करणारा गोलंदाज.[३०]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआयचा मोठा घरचा मोसम: १३ कसोटी, सहा नवी मैदाने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारतीय क्रिकेट वेळापत्रक: २०१६-१७ मधील सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि तारखा". इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "चवथ्या मालिकाविजयासह भारताचा यशस्वी मोसम" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंडिया कम्प्लिट द टेस्ट-ट्रॉफी सेट" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची सुरवात पुण्यातून". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: डीआरएसला हिरवा सिग्नल". एबीसी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "पुण्यातल्या पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाची खडतर चाचणी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढाईसाठी विराटसेना 'जैसे थे'". महाराष्ट्र टाइम्स. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "भारतीय दौऱ्यासाठी स्वेप्सन फिरकी चौकडीत सामील". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतग्रस्त मिचेल मार्शच्या ऐवजी कसोटी संघात स्टोइनिस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारतीय संघात विजय कायम; दुखापतीमुळे पंड्या बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतग्रस्त [[मिचेल स्टार्क]] कसोटी मालिकेबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ मार्च २०१७ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "स्टार्कच्या जागी पॅट कमिन्सला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कोहलीऐवजी श्रेयस अय्यरला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रेनशॉ, स्टार्क प्रॉप अप ऑस्ट्रेलिया". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी: भारतातील मोसमातील सर्वात जास्त बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रम आर. अश्विनने मोडला". स्पोर्ट्सकीडा (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ओ'कीफेच्या सहा बळींमुळे भारताचा डाव १०५ धावांवर आटोपला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "भारताचे सात-गडी बाद होण्याची सर्वात वाईट वेळ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "ओ'कीफे, स्मिथतर्फे ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "ल्योनचे ५० धावांत ८ बळी - दौरा करणाऱ्या गोलंदाजाची भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "अश्विन: कसोटीमधील सर्वात कसोट्यांमध्ये २५ वेळा पाच-गडी बाद करण्याची कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "आठवड्याभराचे वादविवाद आणि बदलांनंतर पुन्हा क्रिकेटकडे" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "स्मिथच्या यशस्वी कारकीर्दीतील आणखी एक मैलाचा दगड" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मॅक्सवेल्स मेडन टन कम्प्लिट्स ट्रायफेक्टा" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "स्टीव्ह स्मिथची संयुक्त-सर्वात लांब कसोटी खेळी" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "पुजाराची भारतातर्फे सर्वात दीर्घ खेळी" (इंग्रजी भाषेत). २१ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "धरमशाला डीसायडर प्रॉमिसेस मोअर सरप्राइजेस" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कोहली कसोटीमधून बाहेर, ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "स्टीव्हन स्मिथ जॉईन्स एलिट परफॉर्मर्स इन इंडिया" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८ २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३ |