Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२
भारत
वेस्ट इंडीज
तारीख ६ – २० फेब्रुवारी २०२२
संघनायक रोहित शर्मा कीरॉन पोलार्ड (१ला ए.दि., ट्वेंटी२०)
निकोलस पूरन (२रा,३रा ए.दि.)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादव (१०४) जेसन होल्डर (६५)
सर्वाधिक बळी प्रसिद्ध कृष्ण (९) अल्झारी जोसेफ (६)
मालिकावीर प्रसिद्ध कृष्ण (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादव (१०७) निकोलस पूरन (१८४)
सर्वाधिक बळी हर्षल पटेल (५) रॉस्टन चेस (६)
मालिकावीर सूर्यकुमार यादव (भारत)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले.

जानेवारी २०२२ मध्ये, मालिकेवर कोव्हिड-१९चा पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन बीसीसीआयने संपूर्ण दौर केवळ दोन शहरामध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने कोलकाता मधील ईडन गार्डन्सवर खेळविण्यात आले. २०२२ आयपीएल लिलावामुळे तिसरा वनडे सामना १२ फेब्रुवारीऐवजी एक दिवस आधी म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी पुनर्निधारीत केला गेला. दौऱ्याच्याआधी काही दिवस आधी भारतीय संघातील काही खेळाडूंना कोव्हिड-१९ची बाधा झाल्याने मालिकेवर संकट आले. परंतु संबंधित खेळाडूंना लागलीच विलगीकरणात ठेवल्यामुळे दौरा नियोजनानुसार पार पडणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.

भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. हा भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध सलग ११वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका विजय होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील भारताने ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
६ फेब्रुवारी २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७६ (४३.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७८/४ (२८ षटके)
जेसन होल्डर ५७ (७१‌)
युझवेंद्र चहल ४/४९ (९.५ षटके)
रोहित शर्मा ६० (५१)
अल्झारी जोसेफ २/४५ (७ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (भारत)


२रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
९ फेब्रुवारी २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३७/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९३ (४६ षटके)
भारत ४४ धावांनी विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: नितीन मेनन (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: प्रसिद्ध कृष्ण (भारत)


३रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
११ फेब्रुवारी २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२६५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६९ (३७.१ षटके)
श्रेयस अय्यर ८० (१११)
जेसन होल्डर ४/३४ (८ षटके)
ओडियन स्मिथ ३६ (१८)
प्रसिद्ध कृष्ण ३/२७ (८.१ षटके)
भारत ९६ धावांनी विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: श्रेयस अय्यर (भारत)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१६ फेब्रुवारी २०२२
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५७/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६२/४ (१८.५ षटके)
निकोलस पूरन ६१ (४३)
रवी बिश्नोई २/१७ (४ षटके)
रोहित शर्मा ४० (१९)
रॉस्टन चेस २/१४ (४ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: रवी बिश्नोई (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • रवी बिश्नोई (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
१८ फेब्रुवारी २०२२
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८६/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७८/३ (२० षटके)
ऋषभ पंत ५२* (२८)
रॉस्टन चेस ३/२५ (४ षटके)
भारत ८ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: नितीन मेनन (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: ऋषभ पंत (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

[संपादन]
२० फेब्रुवारी २०२२
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८४/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६७/९ (२० षटके)
निकोलस पूरन ६१ (४७)
हर्षल पटेल ३/२२ (४ षटके)
भारत १७ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • अवेश खान (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.



१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२