ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७–१८ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १२ सप्टेंबर – १३ ऑक्टोबर २०१७ | ||||
संघनायक | विराट कोहली | स्टीव्ह स्मिथ (ए.दि.) डेव्हिड वॉर्नर (टी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (२९६) | अॅरन फिंच (२५०) | |||
सर्वाधिक बळी | कुलदीप यादव (७) | नेथन कल्टर-नाईल (१०) | |||
मालिकावीर | हार्दीक पंड्या (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | केदार जाधव (२७) | मोजेस हेन्रीक्स (७०) | |||
सर्वाधिक बळी | जसप्रीत बुमराह (३) | जेसन बेह्रेनड्रॉफ (४) |
सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला.[१][२][३][४] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या.[५][६] एकदिवसीय मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरूद्ध ५० षटकांचा सामना खेळताना १०३ धावांनी विजय मिळवला.[७] भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकूलन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा पहिले स्थान मिळवले.[८] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळण्याच्या नवीन अटींनुसार, पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) या मालिकेत पहिल्यांदाच टी२० सामन्यात वापरण्यात आली.[९] तिसरा सामना ओल्या मैदानामुळे होऊ न शकल्याने, टी२० मालिका १–१ अशी अनिर्णित राहिली.[१०]
संघ
[संपादन]एकदिवसीय | टी२० | ||
---|---|---|---|
भारत[११] | ऑस्ट्रेलिया[१२] | भारत[१३] | ऑस्ट्रेलिया[१२] |
- ऑगस्ट २०१७ मध्ये बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत खेळताना दुखापत झाल्याने जोश हेजलवूडला ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्यात आले.[१४] त्याच्या जागी संघात केन रिचर्डसनची निवड करण्यात आली.
- पोटरीच्या दुखापतीने त्रस्त अॅरन फिंचला बदली खेळाडू म्हणून पीटर हॅंड्सकोंबला ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात निवडले गेले.[१५]
- तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अॅश्टन अॅगरच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने, त्याला उर्वरित मालिकेला मुकावे लागले.[१६]
- पत्नीच्या आजारपणामुळे शिखर धवन पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकला नाही.[१७] तीन एकदिवसीय सामन्यांनंतर त्याच्या नावाचा विचार शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी झाला नाही, तसेच त्याच्या ऐवजी बदली खेळाडू सुद्धा नेमला गेला नाही.[१८]
- अक्षर पटेलच्या घोट्याला दुखापत झाल्याने, त्याच्याऐवजी पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले.[१९] पटेलची शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांत जडेजाच्या जागी निवड करण्यात आली.[२०]
- टी२० मालिकेआधी, ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला विश्रांती दिली.[२१] त्याच्याऐवजी अँड्र्यू टेची संघात निवड करण्यात आली.[२२]
- पाचव्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना, स्टीव्ह स्मिथच्या खांद्याला दुखापत झाल्याने, टी२० मालिकेमध्ये त्याच्या ऐवजी मार्कस स्टोइनिसची निवड करण्यात आली तर, डेव्हिड वॉर्नरने कर्णधार पदाची धुरा वाहिली.[२३]
सराव सामना
[संपादन]एकदिवसीयः भारत अध्यक्षीय एकादश वि ऑस्ट्रेलिया
[संपादन]एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- स्टीव्ह स्मिथ (ऑ) चा हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[२४]
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा भारतीय गोलंदाज.[२५]
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डेव्हिड वॉर्नरचा (ऑ) १००वा एकदिवसीय सामना आणि १००व्या सामन्यात शतक करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज.[२६][२७]
- उमेश यादवचे (भा) एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी.[२८]
- विराट कोहली (भा) हा कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला (३६).[२९]
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी सामन्यात १२४ धावांची सलामी दिली. भारतातर्फे २०१७ मधील ही आठवी शतकी सलामी होती. एका कॅलेंडर वर्षात भारतातर्फे पहिल्यांदाच आठ शतकी सलामी झाल्या.[३०]
- रोहित शर्माच्या (भा) एकदिवसीय कारकीर्दीतील ६,००० धावा पूर्ण.[३०]
टी२० मालिका
[संपादन]१ला टी२०
[संपादन]
२रा टी२०
[संपादन]
३रा टी२०
[संपादन]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "भविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ ऑक्टोबर रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान भारतीय क्रिकेट संघ मायदेशात विक्रमी २३ सामने खेळणार". हिंदुस्तान टाईम्स. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गुवाहाटी, तिरुवनंतपूरम टी२० पदार्पणासाठी सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा भारत दौरा सप्टेंबर १७ पासून". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा भारत दौरा १७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मायदेशातील ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड मालिकेच्या तारखा बीसीसीआयतर्फे जाहीर". विस्डेन इंडिया. 2017-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाच्या सरावसामन्यातील विजयात स्टॉयनिसचे महत्त्वपूर्ण योगदार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "१ल्या क्रमांकासह भारताची ऑस्ट्रेलिया मालिका समाप्त". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नवीन नियमांचा फायदा झाल्याचा ऑस्ट्रेलियाचा नकार". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हैदराबादचा टी२० सामना रद्द, भारत-ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "उमेश, शमीचे भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "भारतीय मालिकेमधून स्टार्क बाहेर, फॉकनर आणि क्रिस्टिनची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी भारतीय संघात नेहरा, कार्तिकची निवड; धवन परतला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हेजलवूड बांगलादेश आणि भारत दौर्यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात हॅंड्सकोंबची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बोट मोडल्याने एकदिवसीय मालिकेमधून अॅगर बाहेर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमधून धवन बाजूला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी धवनचा विचार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताच्या एकदिवसीय संघात जडेजा परतला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात अक्षरची निवड". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध टी२० मालिकेत कमिन्स खेळणार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "टी२० संघात कमिन्सची जागा टे घेणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतला, डेव्हिड वॉर्नर नेतृत्व करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "१००व्या सामन्याने स्मिथची वाढ अधोरेखित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा भारतीय गोलंदाज". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "विजयश्रृंखला विक्रमावर भारताचे लक्ष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "१००व्या सामन्यात शतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज" (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "उमेश यादवचे बंगलोर येथे एकदिवसीय क्रिकेटमधील १०० बळी पूर्ण". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी: बंगळूर पराभवानंतरही विराट कोहली आणि संघाचे अनेक विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "भारत वि ऑस्ट्रेलिया २०१७, ५वा एकदिवसीय सामना आकडेवारी: रोहित शर्माने विराट कोहलीचा विक्रम मोडला". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया स्क्रॅम्ब्लिंग टू कीप सिरीज अलाईव्ह". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८ २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३ |