श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
| श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८ | |||||
| तारीख | ११ नोव्हेंबर २०१७ – २४ डिसेंबर २०१७ | ||||
| संघनायक | विराट कोहली (कसोटी) रोहित शर्मा (ए.दि आणि टी२०.) |
दिनेश चंदिमल (कसोटी) थिसारा परेरा (ए.दि. आणि टि२०) | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | विराट कोहली (६१०) | दिनेश चंदिमल (३६६) | |||
| सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (१२) | सुरंगा लकमल (८) दिलरुवान परेरा (८) | |||
| मालिकावीर | विराट कोहली (भारत) | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (२१७) | अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (१५३) | |||
| सर्वाधिक बळी | युझवेंद्र चहल (६) | थिसारा परेरा (५) | |||
| मालिकावीर | शिखर धवन (भारत) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (१६२) | कुसल परेरा (१००) | |||
| सर्वाधिक बळी | युझवेंद्र चहल (८) | दुश्मंत चमीरा (३) थिसारा परेरा (३) नुवान प्रदीप (३) | |||
| मालिकावीर | जयदेव उनाडकट (भारत) | ||||
श्रीलंका क्रिकेट संघ नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.मूळ वेळापत्रकानुसार या दौऱ्यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि १ टी२० सामना आयोजित केले होते.
मार्च २०१७ मध्ये, श्रीलंका क्रिकेट ने २०१७-१८ निदाहास चषक या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले,मर्यादित षटकांची तिरंगी मालिका ज्यात श्रीलंका, भारत आणि बांग्लादेश हे देश सहभाग घेणार आहेत. ही स्पर्धा मार्च २०१८ मध्ये होणार आहे[१] . श्रीलंका क्रिकेट अध्यक्ष श्री.थिलंगा सुमाथीपाला यांनी या दौऱ्यातील काही सामने २०१७-१८ निदाहास चषकत खेळवण्यत येतील असे जाहीर केले. सुधारित वेळापत्रकानुसार आता या दौऱ्यात ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने आयोजित केले आहेत. कसोटी मालिकेआधी सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
ऑगस्ट २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी मैदानांची घोषणा केली. कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता, नागपूर आणि नवी दिल्ली येथे होतील. एकदिवसीय सामन्यांसाठी धरमशाला, मोहाली, विशाखापट्टणम या शहरांची निवड करण्यात आली. तर कटक, इंदूर आणि मुंबई या शहरांची टी२०साठी निवड निश्चित झाली.
भारताने कसोटी मालिका १-० अशा फरकाने जिंकली. विराट कोहली हा मालिकावीर झाला. भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. शिखर धवन हा मालिकावीर झाला.[२]
संदर्भ
[संपादन]संघ
[संपादन]| कसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
|---|---|---|---|---|---|
हार्दिक पांड्याल्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी त्याला विश्रांती देण्यात आली.[४]. रोहित शर्माकडे एकदिवसीय मालिका व टी२० मालिकेसाठी कर्णधार पदाची धुरा सोपविण्यात आली.[५]. ३ऱ्या कसोटीसाठी रंगना हेरतच्या जागी जेफ्री वॅन्डरसे याला संधी देण्यात आली आहे.[६]
दौरा सामने
[संपादन]११-१२ नोव्हेंबर
|
वि
|
||
- नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय संघ, गोलंदाजी
- प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
- लहिरु थिरिमन्ने (श्री) याने प्रथम वर्गीय क्रिकेट मध्ये पहिला बळी घेतला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१६-२० नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, गोलंदाजी.
- पावसामुळे खेळ पहिल्या दिवशी उपहारानंतर सुरू झाला.
- श्रीलंका क्रिकेट संघ तब्बल ८ वर्षांनंतर भारतात कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला.
- पहिल्या दिवशी पावसामुळे ११.५ षटकांचाच खेळ होऊ शकला.
- लोकेश राहुल (भा) डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. (असा बाद होणारा भारताचा ६वा खेळाडू)
- २र्या दिवशीही पावसामुळे उपहारानंतरचा खेळ होऊ शकला नाही.
- सामन्याच्या तिसर्या दिवशी पंच रिचर्ड केटलबोरो (इं) यांच्याजागी जॉयल विल्सन (विं) हे पंच म्हणून उभे राहिले.
- विराट कोहली ( भा ) याची १०४ * ही ह्या मैदानावरील कसोटीतील सर्वोच्च खेळी होय.
- विराट कोहली ( भा ) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ५०वे शतक ठोकले.
- चेतेश्वर पुजारा ( भा ) सलग पाच दिवस फलंदाजी करणारा भारताचा तिसरा, तर जगातला नव्वा खेळाडू ठरला.
- भुवनेश्वर कुमार ( भा ) याने त्याच्या कसोटी कारर्कीदीतील ५०वा बळी घेतला.
- भारताची पहिल्या डावातील १७२ ही धावसंख्या श्रीलंकेविरुद्ध भारतात केलेली दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या.
पहिल्या दिवशी सामना तब्बल साडेतीन तासाने सुरू झाला. डावाच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुल डिकवेलाकरवी झेलबाद झाला. पहिला दिवस पावसामुळे १७/३ या धावसंख्येवर थांबण्यात आला.
२री कसोटी
[संपादन]२४-२८ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
- विराट कोहली (भा) भारताचा कसोटी कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारा एकमेव फलंदाज. सुनील गावसकर यांचा कर्णधार म्हणून ९ शतकांचा विक्रम मोडला (कर्णधार म्हणून १० शतके).[७]
- चेतेश्वर पुजाराने (भा) भारतामध्ये कसोटीत ३,००० धावा जलदगतीने पूर्ण केल्या. सचिन तेंडूलकर (भा) याला मागे टाकले
- दिनेश चंदिमल (श्री) याने ३,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
- दिमुथ करुणारत्ने (श्री) याने २०१७ वर्षातील १,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
- मुरली विजय (भा) याने कसोटीतील १०वे शतक पूर्ण केले.
- चेतेश्वर पुजारा (भा) याने २०१७ वर्षातील १,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
- विराट कोहली (भा) ह्याने कर्णधार म्हणून ५वे द्विशतक झळकावत ब्रायन लारा (विं) यांच्याशी साधली बरोबरी.
- विराट कोहली (भा) एकाच वर्षात १० आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा पहिला फलंदाज ठरला.
- श्रीलंकेचा हा १००वा कसोटी पराभव, तर भारताचा कसोटीतील सर्वात मोठा विजय
- रविचंद्रन अश्विन (भा) याने कसोटीमधील ३०० बळी पूर्ण केले तर तीनही फॉरमॅट मध्ये ५०० बळी घेतले.
- भारताने एका वर्षात ३२ आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा पराक्रम केला.
३री कसोटी
[संपादन]२-६ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- कसोटी पर्दापण : रोशन सिल्वा (श्री)
- दिलरुवान परेरा (श्री) याने २५व्या कसोटी सामन्यात १००वा कसोटी बळी घेतला. मुथिया मुरलीधरन (श्री) याचा २७ सामन्याचा विक्रम मोडला.
- विराट कोहली (भा) याने ५,००० कसोटी धावा तर १६,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.
- विराट कोहली (भा) हा कसोटी कर्णधार म्हणून ३ कसोटी मालिकेत प्रत्येक सामन्यात शतक झळकावणारा पहिला क्रिकेट खेळाडू बनला.
- विराट कोहली (भा) आणि मुरली विजय (भा) यांची श्रीलंकेविरूद्ध कोणत्याही गड्यासाठी केलेली सर्वोच्च भागीदारी होय.(२८३ धावा)
- क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सामना २ऱ्या दिवशी उपहारानंतर प्रदुषणामुळे ४० मिनिटांकरता थांबविला गेला.[८]
- शिखर धवन (भा) याने २,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
- प्रदुषणाच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयाने दिल्लीत सामन्याला परवानगी दिल्याबद्दल दिल्ली सरकारला नोटीस बजावली
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : श्रेयस अय्यर (भा)
- रोहित शर्मा (भा) (२४वा कर्णधार) आणि थिसारा परेरा (श्री) या दोघांनीही कर्णधार पदार्पण केले.
- ही भारताची भारतात पहिल्यांदा फलंदाजी करताना केलेली सर्वात निचांकी धावसंख्या.[९]
- भारताने पहिले ५ गडी १६ धावात गमावले.(कमी धावात).
- दिनेश कार्तिक (भा) याने शून्यावर बाद होण्यापुर्वी सर्वाधीक चेंडू खेळले.(१८)
- कुलदीप यादव (भा) याने त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वाधीक धावा नोंदविल्या.(१९)
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : वॉशिंग्टन सुंदर (भा)
- रोहित शर्मा (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ द्विशतकं करणारा जगातला पहिलाच खेळाडू.[१०]
- श्रेयस अय्यर (भा) याने त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकाविले.
- नुवान प्रदीप (श्री) याने एका डावात ३ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधीक धावा दिल्या.(१०६)
- अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (श्री) याने ५,००० एकदिवसीय धावा केल्या तर १००वा एकदिवसीय बळी घेतला.
- निरोशन डिकवेला (श्री) याने १,००० एकदिवसीय धावा केल्या.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- जून २०१६ पासून भारताने सलग ८ द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
- शिखर धवन (भा) याने ४,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
टी२० मालिका
[संपादन]१ला टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- टी२० पदार्पण : विश्वा फर्नांडो (श्री)
- हा श्रीलंकेचा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
- रोहित शर्मा (भा) याने टी२० मध्ये कर्णधार म्हणून पदार्पण केले.
- हा टी२० मधील धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा विजय तर श्रीलंकेचा सर्वात मोठा पराभव होता.[११]
- नुवान प्रदीप (श्री) याने त्याच्या टी२० कारकीर्दीतील पहिला बळी मिळविला.
- जयदेव उनाडकट (भा) याने त्याच्या टी२० कारकीर्दीतील पहिला बळी मिळविला.
२रा टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- ह्या मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होय.[१२]
- भारताची टी२० मधील ही सर्वाधीक धावसंख्या.[१३]
- रोहित शर्माने (भा) भारतातर्फे टी२०त सर्वात जलद शतक पूर्ण केले.
- रोहित शर्मा (भा) टी२० त २ शतके झळकविणारा भारताचा एकमेव खेळाडू ठरला.[१४].
- लोकेश राहुल (भा) आणि रोहित शर्मा (भा) यांची १६५ धावांची भागीदारी ही भारताची टी२०तील सर्वोतकृष्ट सलामी भागीदारी होय.
३रा टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- टी२० पदार्पण : वॉशिंग्टन सुंदर (भा). भारताकडून टी२० सामना खेळणारा सुंदर हा सर्वात युवा खेळाडू. (१८ वर्षे ८० दिवस)
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "भारताने एकदिवसीय मालिका घातली खिशात, सलग ८वी द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा महापराक्रम".
- ^ "टी२० साठी भारतीय संघ जाहीर, थंपी, सुंदर आणि दिपक हुडाला संधी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "हार्दिक पांड्या कसोटी मालिकेतून बाहेर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "विराटला विश्रांती, रोहित शर्मा करणार एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "जेफ्री वॅन्डरसे रंगना हेरतच्या जागी ३ऱ्या कसोटीत खेळणा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "विराट कोहलीने मोडले अनेक दिग्गजांचे विक्रम, गावसकर यांना टाकले मागे" (इंग्लिश भाषेत). २६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "प्रदुषणाचा दिल्ली कसोटीला फटका, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळ प्रदुषणामुळे स्थगित" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "धरमशालेत भारताचा दारुण पराभव, लंकेच्या गोलंदाजांची तुफानी गोलंदाजी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "रोहितचे वनडेत तिसरे द्विशतक, क्रिकेटजग नतमस्तक" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "कटकमध्ये लंकेने भारतापुढे गुडघे टेकले, दारुण पराभव" (इंग्लिश भाषेत). २१ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "होळकर मैदान टी२० सामन्याच्या पदार्पणासाठी सज्ज" (इंग्लिश भाषेत). २२ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "रोहित व राहुल च्या फटकेबाजीने भारताला विशाल धावसंख्या उभारण्यात यश" (इंग्लिश भाषेत). २२ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "रोहितचे दमदार शतक" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

