बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२
Flag of Zimbabwe.svg
झिम्बाब्वे महिला
Flag of Bangladesh.svg
बांगलादेश महिला
तारीख १० – १५ नोव्हेंबर २०२१
संघनायक मेरी-ॲन मुसोंडा फाहिमा खातून (१ला म.ए.दि.)
निगार सुलताना
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मोदेस्तर मुपाचिक्वा (४८) मुर्शिदा खातून (९७)
सर्वाधिक बळी इस्थर म्बोफाना (३) नाहिदा अक्तेर (११)
मालिकावीर नाहिदा अक्तेर आणि मुर्शिदा खातून (बांगलादेश)

बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२१ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही संघांनी ही मालिका नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वेमध्ये झालेल्या २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली. झिम्बाब्वे आणि बांगलादेशमधील ही पहिलीच महिला वनडे द्विपक्षीय मालिका होती. बांगलादेश महिलांनी नोव्हेंबर २०१९ दरम्यान पाकिस्तानी महिलांशी खेळल्यानंतर पहिल्यांदाच महिला वनडे सामने खेळले. सर्व सामने बुलावायो मधील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळविण्यात आले.

बांगलादेशी महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ही ३-० अश्या फरकाने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१० नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
४८ (२३.२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४९/२ (१०.४ षटके)
बांगलादेश महिला ८ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: स्टॅन्ले गोग्वे (झि) आणि पर्सिवल सिझारा (झि)
  • नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.
  • झिम्बाब्वे आणि बांगलादेश मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • बांगलादेशने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • बांगलादेश महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • क्रिस्टाबेल चॅटॉन्झवा आणि फ्रांसिस्का चिपारे (झि) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

१३ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२१ (४६.४ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२५/१ (२४.३ षटके)
फरगाना होक ५३* (६८)
इस्थर म्बोफाना १/३० (५.३ षटके)
बांगलादेश महिला ९ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: तफाद्झ्वा मुसाक्वा (झि) आणि पर्सिवल सिझारा (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
  • शार्नी मायर्स (झि) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा सामना[संपादन]

१५ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
७२ (२७.२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७४/३ (१८.२ षटके)
शार्नी मायर्स ३९ (६१)
नाहिदा अक्तेर ५/२१ (१० षटके)
बांगलादेश महिला ७ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: स्टॅन्ले गोग्वे (झि) आणि पर्सिवल सिझारा (झि)
सामनावीर: नाहिदा अक्तेर (बांगलादेश)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
  • फरिहा तृष्ना (बां) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.