२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२१-२३ आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (World Test Championship)
तारीख ४ ऑगस्ट २०२१ – जून २०२३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार कसोटी सामने
स्पर्धा प्रकार लीग आणि अंतिम सामना
यजमान विविध
सहभाग
२०१९-२१ (आधी) (नंतर) २०२३-२५

२०२१-२३ आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने २०१९ साली सुरु केलेल्या कसोटी सामने असणाऱ्या लीग स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती आहे. ४ ऑगस्ट २०२१ रोजी इंग्लंड आणि भारत यांच्या कसोटी सामन्याद्वारे या स्पर्धेस सुरुवात होईल व जून २०२३ मध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. या आवृत्तीमध्ये केवळ २०२१-२२ ॲशेस मालिका आणि इंग्लंड आणि भारत कसोटी मालिका या दोनच मालिका अश्या आहेत ज्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले गेले. बाकी मालिका दोन किंवा तीन सामने असलेल्या होत्या. न्यूझीलंड संघ गतविजेता आहे.

सहभागी देश[संपादन]

एकूण १२ कसोटी देशांपैकी झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंड या तीन देशांव्यतिरिक्त उर्वरीत खालील ९ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला :

देश/संघ पात्रतेचा मार्ग पुर्वीच्या विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य २०१९-२१ तिसरे स्थान (२०१९-२१)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१९-२१ नववे स्थान (२०१९-२१)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०१९-२१ चौथे स्थान (२०१९-२१)
भारतचा ध्वज भारत २०१९-२१ उपविजेते (२०१९-२१)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१९-२१ विजेते (२०१९-२१)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१९-२१ सहावे स्थान (२०१९-२१)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०१९-२१ पाचवे स्थान (२०१९-२१)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१९-२१ सातवे स्थान (२०१९-२१)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१९-२१ आठवे स्थान (२०१९-२१)

स्पर्धा प्रकार[संपादन]

सदर स्पर्धा ही २ वर्षांच्या कालावधीत खेळवली गेली. प्रत्येक संघाने कोणत्याही ६ संघांबरोबर मालिका खेळल्या. तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशी भूमीवर अश्या तत्वावर गट फेरीचे सामने आणि मालिका खेळवल्या गेल्या. त्यामुळे जरी कसोटींची संख्या वेगळी असली तरी सर्व संघ हे समसमान मालिका खेळले. सर्व सामने पाच दिवसांचे नियोजित होते.

गुण वाटप पद्धत[संपादन]

या आवृत्तीसाठी मागच्या आवृत्तीपेक्षा वेगळी गुण वाटप पद्धत अंगीकारली गेली. या वेळेस मालिकांना मिळणाऱ्या गुणांची पद्धत रद्दबातल ठरविण्यात आली आणि प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्र गुण पद्धत स्वीकारली गेली.

गुणवाटप पद्धत :

  • सामना जिंकल्यास १२ गूण
  • सामना टाय झाल्यास ६ गूण
  • सामना बरोबरीत सुटल्यास ४ गूण

गुणकपात पद्धत : सामना चालु असताना जर एखादा संघ गोलंदाजी करत असतान त्या संघाची षटक गती कमी असल्यास संघ जितके षटके मागे आहे तितके गूण कापण्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण गुणांमध्ये कपात प्रतिस्पर्धात्मक गुणांपैकी गुणांची टक्केवारी रन/विकेट रेशो नोट्स
भारतचा ध्वज भारत २४ ५४.१६% १.०५४ अंतिम सामन्यात बढती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ ५०.००% १.२६७
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२ ५०.००% ०.७९०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४ २९.१६% ०.९४८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश

कापलेल्या गुणांचा तपशील[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक कसोटी संख्या निकाल

सीजन २०२१

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ४ ऑगस्ट २०२१ ५ (४ समाप्त, १ स्थगित)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ ऑगस्ट २०१९ १-१