१९९३-९४ हिरो चषक
Appearance
(हिरो चषक, १९९३-९४ या पानावरून पुनर्निर्देशित)
हिरो चषक | |
---|---|
इडन गार्डन्स, बाद फेरीचे स्थळ | |
तारीख | ७ – २७ नोव्हेंबर १९९३ |
व्यवस्थापक | बंगाल क्रिकेट असोसिएशन |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने |
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद फेरी |
यजमान | भारत |
विजेते | भारत |
सहभाग | ५ |
सामने | १३ |
मालिकावीर | मोहम्मद अझरूद्दीन |
सर्वात जास्त धावा | मोहम्मद अझरूद्दीन (३११) |
सर्वात जास्त बळी | विन्स्टन बेंजामिन (१४) |
१९९३-९४ हिरो चषक ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ७ ते २७ नोव्हेंबर १९९३ दरम्यान भारतामध्ये आयोजित केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सदर स्पर्धा भरवली गेली. यजमान भारतसह, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या पाच देशांचे क्रिकेट संघ सदर स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा पराभव करून हिरो चषकावर आपले नाव कोरले.[१] भारताचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.
मैदाने
[संपादन]दहा साखळी सामन्यांसाठी १० वेगवेगळी मैदाने वापरली गेली. उपांत्य सामने आणि अंतिम सामना कोलकाता येथे झाला.[२]
ग्रीन पार्क (कानपूर)
वानखेडे (मुंबई)
चिन्नास्वामी (बंगळूर)
ब्रेबॉर्न (मुंबई)
मोईन-उल-हक (पटणा)
मोटेरा (अहमदाबाद)
नेहरू मैदान (इंदूर)
नेहरू मैदान (गुवाहाटी)
लाल बहादूर शास्त्री (हैदराबाद)
पीसीए (मोहाली)
इडन गार्डन्स (कोलकाता)
संघ
[संपादन]भारत | दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | वेस्ट इंडीज | झिम्बाब्वे |
---|---|---|---|---|
गुणफलक
[संपादन]संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | १.०५५ | उपांत्य फेरीत बढती |
दक्षिण आफ्रिका | ४ | २ | १ | ० | १ | ५ | ०.५४३ | |
भारत | ४ | २ | १ | १ | ० | ५ | ०.०८२ | |
श्रीलंका | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.४७८ | |
झिम्बाब्वे | ४ | ० | २ | १ | १ | २ | -१.२६० |
गट फेरी
[संपादन] ९ नोव्हेंबर १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३७ षटकांचा करण्यात आला आणि त्यानंतर पहिल्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
- जॉन रेनी आणि हीथ स्ट्रीक (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१४ नोव्हेंबर १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.
१५ नोव्हेंबर १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- गाय व्हिटॉल (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१६ नोव्हेंबर १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- भारताने ६ गडी गमावल्यानंतर प्रेक्षकांनी घातलेल्या हुल्लडबाजीमुळे ४० मिनीटांचा खेळ वाया गेला आणि १२ षटकांत विजयासाठी भारतासमोर १७० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- ह्या सामन्यातील विजयामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरीसाठी पात्र.
१९ नोव्हेंबर १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- ह्या सामन्यातील विजयामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- ह्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंका आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र तर झिम्बाब्वे स्पर्धेतून बाद.
बाद फेरी
[संपादन]उपांत्य सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- इडन गार्डन्स वरील पहिलाच प्रकाश झोतात खेळवला गेलेला सामना.
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "हिरो चषक, १९९३-९४" (इंग्रजी भाषेत). २३ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "हिरो चषक: वेळापत्रक आणि निकाल". २३ जून २०१६ रोजी पाहिले.