नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
दक्षिण आफ्रिका
नेदरलँड्स
तारीख २६ नोव्हेंबर – १ डिसेंबर २०२१
संघनायक केशव महाराज पीटर सीलार
एकदिवसीय मालिका

नेदरलँड्स क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. दोन्ही संघांनी मे २०१३ नंतर प्रथमच एकमेकांबरोबर वनडे सामने खेळले. ही मालिका पहिलीच वेळ अशी होती की दोन्ही संघ एकमेकांसोबत दक्षिण आफ्रिकेत खेळले. मालिकेपूर्वी नेहमीचा कर्णधार टेंबा बवुमा अनुपस्थित असल्याने केशव महाराजला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार नियुक्त केले गेले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सला २७८ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु पावसामुळे नेदरलँड्सचा डाव केवळ २ षटकांनंतर थांबविण्यात आला. त्यानंतर पाऊस न थांबल्याने सामना अनिर्णित राहिला. नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाचा ओमिक्रॉन नामक वेगळ्या प्रकारचा विषाणूचा झपाट्याने फैलाव होण्यास सुरुवात झाली. युरोपीय देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिकी खंडामधून होणारी प्रवासी विमान वाहतूक स्थगित केली. नेदरलँड्स सरकारने ही अश्या विमानसेवा स्थगित केल्या. त्यामुळे उर्वरीत दौऱ्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर २७ नोव्हेंबर रोजी उर्वरीत दोन सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड उर्वरीत दोन सामने येणाऱ्या मोसमात खेळविण्यासाठी प्रयत्न करतील असे जाहीर करण्यात आले.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
२६ नोव्हेंबर २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७७/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११/० (२ षटके)
काईल व्हेरेइन ९५ (११२)
फ्रेड क्लासेन २/४५ (८ षटके)


२रा सामना[संपादन]

३१ मार्च २०२३
१३:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१८९ (४६.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९०/२ (३० षटके)
तेजा निदामनुरु ४८ (७१)
तबरेझ शम्सी ३/२५ (१० षटके)
टेंबा बावुमा ९०* (७९)
आर्यन दत्त १/३० (६ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून विजय मिळवला
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: मराइस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका) आणि अलाहुद्दीन पालेकर (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: सिसंदा मागाला (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: दक्षिण आफ्रिका १०, नेदरलँड्स ०.


३रा सामना[संपादन]

२ एप्रिल २०२३
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३७०/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२२४ (३९.१ षटके)
एडन मार्कराम १७५ (१२६)
फ्रेड क्लासेन २/४३ (१० षटके)
मुसा अहमद ६१ (६९)
सिसंदा मगाला ५/४३ (९ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १४६ धावांनी विजय मिळवला
वॉंडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मराइस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका) आणि एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका) त्याचा ५०वा एकदिवसीय सामना खेळला.[१]
  • एडन मार्करामने वनडेतील पहिले शतक झळकावले.[२]
  • सिसांडा मागाला (दक्षिण आफ्रिका) ने वनडेत पहिले पाच बळी घेतले.[३]
  • विश्वचषक सुपर लीग गुण: दक्षिण आफ्रिका १०, नेदरलँड्स ०.
  1. ^ "Markram 175, Magala five-fer take SA closer to World Cup spot". Cricbuzz. 2 April 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Markram, Magala star in 146-run victory". ESPNcricinfo. 2 April 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Markram ton, Magala five-for lift Proteas to massive win over Netherlands". Supersport. 2 April 2023 रोजी पाहिले.