भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२ | |||||
दक्षिण आफ्रिका | भारत | ||||
तारीख | २६ डिसेंबर २०२१ – २३ जानेवारी २०२२ | ||||
संघनायक | डीन एल्गार (कसोटी) टेंबा बवुमा (ए.दि.) |
विराट कोहली (१ली,२री कसोटी) लोकेश राहुल (२री कसोटी, ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कीगन पीटरसन (२७६) | लोकेश राहुल (२२६) | |||
सर्वाधिक बळी | कागिसो रबाडा (२०) | मोहम्मद शमी (१४) | |||
मालिकावीर | कीगन पीटरसन (दक्षिण आफ्रिका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्विंटन डी कॉक (२२९) | शिखर धवन (१६९) | |||
सर्वाधिक बळी | अँडिल फेहलुक्वायो (६) | जसप्रीत बुमराह (५) | |||
मालिकावीर | क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) |
भारत क्रिकेट संघाने डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. दौऱ्यापूर्वी विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला भारताच्या वनडे कर्णधारपदी नेमण्यात आले. परंतु सराव सत्रादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाल्याने लोकेश राहुलला एकदिवसीय संघाचा तात्पुरता कर्णधार नियुक्त करण्यात आले. नोव्हेंबर २०२१, दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये ओमायक्रॉन या कोव्हिड-१९चा उपरोग फैलावल्यामुळे दौऱ्याबद्दल अनिश्चितता होती. परंतु हा दौरा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे विधान विराट कोहलीने स्पष्ट केले. जोहान्सबर्ग येथे होणारी तिसरी कसोटी कोव्हिड-१९ च्या नियमांमुळे केपटाउनला हलविण्यात आली. ४ डिसेंबर २०२१ रोजी वेळापत्रकातून मूलत: असलेले चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने वगळून तीन कसोटी आणि तीन वनडे सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले.
भारताने सेंच्युरियन येथील पहिली कसोटी ११३ धावांनी जिंकली. सेंच्युरियनच्या मैदानावरचा भारताचा हा पहिला कसोटी विजय ठरला. दुसऱ्या कसोटीपूर्वी पाठीला दुखापत झाल्याने विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुलने दुसऱ्या कसोटीत भारताचे कर्णधारपद सांभाळले. दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. तसेच ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटीत वॉन्डरर्स स्टेडियमवर पराभूत केले. तिसरी कसोटी देखील ७ गडी राखून जिंकत दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. कसोटी मालिकेनंतर विराट कोहली याने भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेने पहिला वनडे सामना ३१ धावांनी जिंकत वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या वनडे सामन्यात रेसी व्हान देर दुस्सेन याने नाबाद १२९ धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेचा हा विजय सोपा केला. दुसरा सामना देखील दक्षिण आफ्रिकेने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. थरारक झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ४ धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- बॉक्सिंग डे कसोटी.
- मार्को यान्सिन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- या सामन्यानंतर क्विंटन डी कॉक (द.आ.) याने कसोटी प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ११[n १], दक्षिण आफ्रिका - ०.
२री कसोटी
[संपादन]
३री कसोटी
[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- मार्को यान्सिन (द.आ.) आणि व्यंकटेश अय्यर (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
नोंदी
[संपादन]- ^ पहिल्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी भारताचा कसोटी विश्वचषकामधून १ गुण कापण्यात आला.