न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२ | |||||
बांगलादेश | न्यू झीलंड | ||||
तारीख | १ – १० सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | महमुद्दुला | टॉम लॅथम | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | महमुद्दुला (१२०) | टॉम लॅथम (१५९) | |||
सर्वाधिक बळी | नसुम अहमद (८) मुस्तफिझुर रहमान (८) |
एजाज पटेल (१०) | |||
मालिकावीर | नसुम अहमद (बांगलादेश) |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मालिका फक्त तीन सामन्यांची होती. परंतु नंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केलेल्या विनंतीनुसार न्यू झीलंडने आणखी दोन सामने खेळण्यास अनुमती दर्शवली. त्यानुसार पाच ट्वेंटी२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व सामने राजधानी ढाका मधील शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले.
बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. न्यू झीलंडने तिसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. परंतु बांगलादेशने चौथ्या सामन्यात विजय मिळवत एक सामना शेष असताना मालिका जिंकली. बांगलादेशने न्यू झीलंडविरुद्ध पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिका जिंकली. न्यू झीलंडने पाचवा सामना जिंकला परंतु त्याआधीच बांगलादेशने मालिकाविजय निश्चित केला असल्याने बांगलादेशने ३-२ ने मालिका जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- कोले मॅककॉन्ची आणि रचिन रविंद्र (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये न्यू झीलंडवरचा पहिलाच विजय.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.