Jump to content

आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१-२२
वेस्ट इंडीज
आयर्लंड
तारीख ८ – १६ जानेवारी २०२२
संघनायक कीरॉन पोलार्ड अँड्रु बल्बिर्नी (१ला ए.दि.)
पॉल स्टर्लिंग (२रा-३रा ए.दि.)
एकदिवसीय मालिका
निकाल आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा शामार ब्रुक्स (१३७) हॅरी टेक्टर (१५९)
सर्वाधिक बळी अकिल होसीन (६) अँड्रू मॅकब्राइन (१०)
मालिकावीर अँड्रू मॅकब्राइन (आयर्लंड)

आयर्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी जानेवारी २०२२ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. सर्व सामने जमैका मधील सबिना पार्क येथे खेळविण्यात आले. एकदिवसीय मालिकेपूर्वी आयर्लंडने जमैकाविरुद्ध ५० षटकांचा सराव सामना खेळला. जमैकाने तो सामना ५ गडी राखून जिंकला.

पदार्पण करणारा शामार ब्रुक्सच्या उत्तम ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान वेस्ट इंडीजने पहिला वनडे सामना २४ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आयर्लंडच्या गोटात पुन्हा कोव्हिडचे संक्रमण झाल्याने दुसरा एकदिवसीय सामना दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या संमतीने पुढे ढकलण्यात आला. ११ जानेवारी रोजी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की दुसरा एकदिवसीय सामना १३ जानेवारी आणि तिसरा एकदिवसीय सामना हा १६ जानेवारी रोजी खेळविण्यात येईल. तसेच नियोजीत एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना रद्द करण्यात आला. आयर्लंडचा कर्णधार अँड्रु बल्बिर्नीला कोरोनाची लागण झाल्याने उर्वरीत दोन वनडे सामन्यांसाठी पॉल स्टर्लिंगकडे आयर्लंडच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. उर्वरीत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत आयर्लंडने वनडे मालिका २-१ ने जिंकली.

सराव सामने

[संपादन]

५० षटकांचा सामना:जमैका वि आयर्लंड

[संपादन]
५ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२३४ (४८.३ षटके)
वि
जमैकाचा ध्वज जमैका
२३५/५ (३८.४ षटके)
जॉर्ज डॉकरेल ८२ (१०७)
निकोलसन गॉर्डन ५/३४ (९.३ षटके)
रोव्हमन पॉवेल ८२* (६३)
जोशुआ लिटल ३/२१ (७ षटके)
जमैका ५ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, किंग्स्टन
  • नाणेफेक : जमैका, क्षेत्ररक्षण.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
८ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६९ (४८.५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२४५ (४९.१ षटके)
शामार ब्रुक्स ९३ (८९)
मार्क अडायर ३/३८ (८.५ षटके)
वेस्ट इंडीज २४ धावांनी विजयी.
सबिना पार्क, किंग्स्टन
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: शामार ब्रुक्स (वेस्ट इंडीज)


२रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
१३ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२९ (४८ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६८/५ (३२.३ षटके)
हॅरी टेक्टर ५४* (७५)
अकिल होसीन २/५१ (८ षटके)
आयर्लंड ५ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
सबिना पार्क, किंग्स्टन
पंच: लेस्ली रीफर (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: अँड्रू मॅकब्राइन (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे आयर्लंडला ३६ षटकांमध्ये १६८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : आयर्लंड - १०, वेस्ट इंडीज - ०.

३रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
१६ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१२ (४४.४ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२१४/८ (४४.५ षटके)
शई होप ५३ (३९)
अँड्रू मॅकब्राइन ४/२८ (१० षटके)
अँड्रू मॅकब्राइन ५९ (१००)
रॉस्टन चेस ३/४४ (१० षटके)
आयर्लंड २ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, किंग्स्टन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: अँड्रू मॅकब्राइन (आयर्लंड)


नोंदी

[संपादन]
  1. ^ पहिल्या वनडेमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी आयर्लंडचे सुपर लीगमधून २ गुण कापण्यात आले.