२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता
२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार |
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने महिला लिस्ट-अ सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि सुपर ६ फेरी | ||
यजमान | झिम्बाब्वे | ||
सहभाग | ९ | ||
सामने | २५ | ||
|
२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला क्रिकेट स्पर्धा होती जी झिम्बाब्वेमध्ये २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान खेळविली गेली. इसवी सन २०२२ मध्ये न्यू झीलंडमध्ये होणाऱ्या २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेमधील ही स्पर्धा शेवटची पायरी होती. महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेची ही पाचवी तर झिम्बाब्वेमध्ये झालेली ही पहिलीच आवृत्ती होती. एकूण १० संघांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. मुख्य पात्रता स्पर्धेसाठी पात्रता ठरविण्याऱ्या सर्व खंडीय स्पर्धा या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारामध्ये खेळविण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेतील सामने हे ५० षटकांचे होते. पात्रता स्पर्धेमधील अव्वल तीन संघ विश्वचषकास पात्र ठरतील तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ हे आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी अव्वल तीन संघांसह पात्र ठरतील असे आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेमधील थायलंड, नेदरलँड्स आणि अमेरिका हे संघ असलेले सामने सोडून इतर सर्व सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता.
मूलत: पात्रता स्पर्धा ३ ते १९ जुलै २०२० दरम्यान श्रीलंकेमध्ये होणार होती. परंतु कोव्हिड-१९ रोग फैलावल्यामुळे मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने वैश्विक टाळेबंदीमुळे आणि बिकट परिस्थिती बघून स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. सरतेशेवटी ऑगस्ट २०२१ मध्ये स्पर्धा झिम्बाब्वे मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यान खेळविली जाईल असे आयसीसीने जाहीर केले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आयसीसीने वेळापत्रक जारी केले. दहा संघांना पाच संघांच्या दोन गटात विभागले गेले. प्रत्येक गटातून अव्वल तीन संघांनी सुपर ६ फेरीमध्ये प्रगती केली. सुपर ६ फेरीमधून अव्वल तीन संघ २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी पात्र ठरले. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ केवळ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी पात्र ठरले.
८ नोव्हेंबर २०२१ रोजी अनेक खेळाडूंना कोव्हिड-१९ झाल्यामुळे पापुआ न्यू गिनीने स्पर्धेतून माघार घेतली. १० नोव्हेंबर रोजी, आयसीसीनेपापुआ न्यू गिनीसाठी बदली संघ न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अ गटातील संघांची संख्या पाच वरून चारवर करण्यात आली. नोव्हेंबर अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोव्हिड-१९चा वेगळ्या प्रकारचा विषाणूचा फैलाव सुरू झाल्याने स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले. क्रिकेट आयर्लंडने परिस्थितीचा आढावा घेत असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी श्रीलंकेच्या तीन खेळाडूंना कोव्हिड-१९ची लागण झाल्याने वेस्ट इंडीजविरुद्धचा श्रीलंकेचा नियोजित सामना रद्द करावा लागला.
त्याच दिवशी उशीरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने जाहीर केले की झिम्बाब्वेमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उर्वरीत पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आली. आयसीसीच्या खेळ नियमांनुसार महिला वनडे क्रमवारीमुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज हे तीन देश २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक तर श्रीलंका आणि आयर्लंड हे दोन देश विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या तीन देशांबरोबर २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र ठरले.
सहभागी देश
[संपादन]खालील संघांनी पात्रता स्पर्धेत भाग घेतला:
पात्रतेचा मार्ग | दिनांक | यजमान | आरक्षित जागा | पात्र देश |
---|---|---|---|---|
आपोआप पात्रता | ||||
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा | नोव्हेंबर २०१८ | स्पर्धेतील निकालानुसार | २ | |
२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप मधील ६-८ स्थानावर असलेले देश | डिसेंबर २०१९ | स्पर्धेतील निकालानुसार | ३ | |
स्थानिक पात्रता | ||||
आशिया | १८-२७ फेब्रुवारी २०१९ | थायलंड | १ | थायलंड |
आफ्रिका | ५-१२ मे २०१९ | झिम्बाब्वे | १ | झिम्बाब्वे |
पूर्व आशिया-प्रशांत | ६-१० मे २०१९ | व्हानुआतू | १ | |
अमेरिका खंड | १७-१९ मे २०१९ | अमेरिका | १ | अमेरिका |
युरोप | २६-२९ जून २०१९ | स्पेन | १ | नेदरलँड्स |
एकूण | १० |
पथके
[संपादन]गट फेरी
[संपादन]गट अ
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | १ | १ | ० | ० | ० | २ | ०.९४७ | २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक आणि २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र |
श्रीलंका | १ | १ | ० | ० | ० | २ | ०.७७९ | २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र |
आयर्लंड | २ | १ | १ | ० | ० | २ | -०.१४१ | |
नेदरलँड्स | २ | ० | २ | ० | ० | ० | -०.६७३ | |
- स्पर्धेपूर्वी कोव्हिड-१९ मुळे पापुआ न्यू गिनीने पात्रता स्पर्धेतून माघार घेतली.
वि
|
वेस्ट इंडीज
१६३/४ (३९.३ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
वि
|
नेदरलँड्स
१९६/६ (४३.४ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे नेदरलँड्स महिलांना ४३.४ षटकांमध्ये २३१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
वि
|
||
- कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
गट ब
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
थायलंड | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ०.४८८ | |
बांगलादेश | ३ | २ | १ | ० | ० | ४ | १.८४१ | २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक आणि २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र |
पाकिस्तान | ३ | २ | १ | ० | ० | ४ | १.०९४ | |
झिम्बाब्वे | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.४३४ | |
अमेरिका | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -३.६१३ |
वि
|
बांगलादेश
२०२/७ (४९.४ षटके) | |
- नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
- पाकिस्तानने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
वि
|
थायलंड
१३२/२ (३९.२ षटके) | |
- नाणेफेक : थायलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- थायलंड महिलांच्या डावादरम्यान पाऊस आला तेव्हा ३९.२ षटकांनंतर डकवर्थ-लुईस पद्धतीच्या गणनेनुसार थायलंड महिला १६ धावांनी पुढे होत्या.
वि
|
झिम्बाब्वे
८१ (२६.२ षटके) | |
- नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
- झिम्बाब्वे आणि पाकिस्तान मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- पाकिस्तानने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
सुपर ६
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
N/A | ० | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
N/A | ० | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
N/A | ० | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
N/A | ० | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
N/A | ० | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
N/A | ० | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- बांगलादेश महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- आयर्लंड महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- श्रीलंका महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- थायलंड महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- अमेरिका महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
- २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक
- इ.स. २०२१ मधील क्रिकेट
- महिला क्रिकेट