२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९-२१ आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (World Test Championship)
तारीख १ ऑगस्ट २०१९ – २३ जून २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार कसोटी सामने
स्पर्धा प्रकार लीग आणि अंतिम सामना
यजमान विविध
विजेते न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (१ वेळा)
सहभाग
सामने ६१
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया मार्नस लेबसचग्ने (१६७५)
सर्वात जास्त बळी भारत रविचंद्रन अश्विन (७१)
(नंतर) २०२१-२३

२०१९-२१ आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही एक नवीन कसोटी सामने असणारी लीग स्पर्धा असणार आहे.[१] जुलै २०१९ मध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर २०२१ साली इंग्लंडमध्ये अंतिम सामना होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे २०१० साली क्रिकेटपटलावर ठेवलेल्या या कल्पनेला वास्तविकतेत उतरायला दशक लागले. २०१३ व २०१७ साली स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. या स्पर्धेत १२ पैकी ९ कसोटी देशांचा समावेश असणार आहे.[२][३] प्रत्येक संघ ८ पैकी ६ संघांविरूद्ध मालिका ३ मायदेशी आणि ३ परदेशी या तत्त्वावर खेळेल. स्पर्धेच्या शेवटी गुणफलकातील अव्वल दोन संघ जेतेपदासाठी इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळतील.

यातील मालिका या दुसऱ्या स्पर्धेतील पण असु शकतात (जसे की २०१९ ॲशेस मालिका), तर सहभागी संघ उर्वरीत ३ देश जे या स्पर्धेत सहभागी नाहित (झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान) यांच्याविरुद्ध देखील कसोटी खेळतील.

भारत आणि न्यू झीलंड अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. साउथहँप्टन वरील रोझ बोल मैदानावर १८-२२ जून २०२१ दरम्यान अंतिम सामना खेळविण्यात आला. तसेच अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आलेला. अंतिम सामन्यात न्यू झीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत पहिला वहिला कसोटी विश्वचषक जिंकला. न्यू झीलंडने १९९८ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर प्रथमच जागतिक क्रिकेट स्पर्धा जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लेबसचग्ने याने स्पर्धेत सर्वाधिक १६७५ धावा केल्या, तर भारताचा रविचंद्रन अश्विन ७१ बळी मिळवत स्पर्धेतील आघाडीचा गोलंदाज ठरला.

सहभागी देश[संपादन]

देश/संघ पात्रतेचा मार्ग पुर्वीच्या विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अंतिम सामन्याचे यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पदार्पण पदार्पण पदार्पण
भारतचा ध्वज भारत पदार्पण पदार्पण पदार्पण
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पदार्पण पदार्पण पदार्पण
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पदार्पण पदार्पण पदार्पण
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पदार्पण पदार्पण पदार्पण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पदार्पण पदार्पण पदार्पण
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पदार्पण पदार्पण पदार्पण

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण गुणांमध्ये कपात प्रतिस्पर्धात्मक गुणांपैकी गुणांची टक्केवारी रन/विकेट रेशो
भारतचा ध्वज भारत (पा) १७ १२ ५२० ७२.२% १.५७७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (पा) ११ ४२० ७०.०% १.२८१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ ३३२ ६९.२% १.३९२
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१ ११ ४४२ ६१.४% १.१२०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३ २६४ ४४.०% ०.७८७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ २८६ ४३.३% ०.८२२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२ २०० २७.८% ०.७२९
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३ १९४ २६.९% ०.६६१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २० ४.८% ०.६०१

माहिती :

  • भारताविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी ठेवल्याने ऑस्ट्रेलियाचे ४ गुण कापले गेले.
  • इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी ठेवल्याने दक्षिण आफ्रिकेचे ६ गुण कापले गेले.
  • दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी ठेवल्याने वेस्ट इंडीजचे ६ गुण कापले गेले.

वेळापत्रक[संपादन]

फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक कसोटी संख्या निकाल

सीजन २०१९

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑगस्ट २०१९ बरोबरीत (१-१)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑगस्ट २०१९ बरोबरीत (२-२)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ऑगस्ट २०१९ भारत (२-०)

सीजन २०१९-२०

भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑक्टोबर २०१९ भारत (३-०)
भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नोव्हेंबर २०१९ भारत (२-०)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान नोव्हेंबर २०१९ ऑस्ट्रेलिया (२-०)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका डिसेंबर २०१९ पाकिस्तान (१-०)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डिसेंबर २०१९ ऑस्ट्रेलिया (३-०)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड डिसेंबर २०१९ इंग्लंड (३-१)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत फेब्रुवारी २०२० न्यू झीलंड (२-०)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश फेब्रुवारी २०२० १ कसोटी झाली, २री स्थगित

सीजन २०२०

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जुलै २०२० इंग्लंड (२-१)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑगस्ट २०२० इंग्लंड (१-०)

सीजन २०२०-२१

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत डिसेंबर २०२० भारत (२-१)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डिसेंबर २०२० न्यू झीलंड (२-०)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान डिसेंबर २०२० न्यू झीलंड (२-०)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका डिसेंबर २०२० दक्षिण आफ्रिका (२-०)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जानेवारी २०२१ इंग्लंड (२-०)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जानेवारी २०२१ वेस्ट इंडीज (२-०‌)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका जानेवारी २०२१ पाकिस्तान (२-०)
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फेब्रुवारी २०२१ भारत (३-१)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्च २०२१ बरोबरीत (०-०)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश एप्रिल २०२१ श्रीलंका (१-०)
सीजन २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका जून २०२१ दक्षिण आफ्रिका (२-०)

अंतिम सामना[संपादन]

अंतिम सामन्याची आधिक माहिती वाचण्यासाठी २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना येथे भेट द्या

अंतिम सामना ज्या मैदानात होणार (रोझ बोल, साउथहँप्टन) त्याचे छायाचित्र

सुरुवातीला अंतिम सामना लॉर्ड्स येथे होणार होता. पण कोरोनाकाळात साउथहॅंप्टन जवळील हॉटेल्स जैविक वातावरणाच्या दृष्टीने सुरक्षीत असल्याने तथापि, १० मार्च रोजी अंतिम सामना साउथहँप्टनला होईल असे आयसीसीचे स्पष्ट केले. याचे संकेत ८ मार्च रोजी म्हणजेच आयसीसीच्या अधिकृत घोषणेच्या दोन दिवस आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले होते. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामन्याच्या दर दिवशी फक्त ४ हजार प्रेक्षकांना सामना पाहण्यास मैदानात प्रवेश दिला गेला. २०२१ आयपीएलच्या स्थगितीनंतर कोणताही सामना न खेळल्याने भारतीय संघाने अंतिम सामन्याच्या आधी चार-दिवसीय आंतर-संघीय सराव सामना खेळला. तर न्यू झीलंडने इंग्लंडमध्येच इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामने खेळले.

१८-२३ जून २०२१
(६ दिवसांची कसोटी)
अंतिम सामना
धावफलक
वि
२१७ (९२.१ षटके)
२४९ (९९.२ षटके)
१७० (७३ षटके)
१४०/२ (४५.५ षटके)

संघांची अंतिम स्थानस्थिती[संपादन]

स्थान संघ
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
भारतचा ध्वज भारत
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश

सांख्यिकी[संपादन]

सर्वाधिक धावा[संपादन]

फलंदाज सामने डाव धावा सरासरी सर्वोत्तम धावा शतके अर्शशतके
ऑस्ट्रेलिया मार्नस लेबसचग्ने १३ २३ १६७५ ७२.८२ २१५
इंग्लंड ज्यो रूट २० ३७ १६६० ४७.४३ २२८
ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ १३ २२ १३४१ ६३.८५ २११
इंग्लंड बेन स्टोक्स १७ ३२ १३३४ ४६.०० १७६
भारत अजिंक्य रहाणे १८ ३० ११५९ ४२.९२ ११५
शेवटचे अद्यतन : २३ जून २०२१[४]

सर्वाधिक बळी[संपादन]

गोलंदाज सामने डाव बळी धावा षटके डावातील उच्च कामगिरी सामन्यातील उच्च कामगिरी सरासरी पाच बळी दहा बळी
भारत रविचंद्रन अश्विन १४ २६ ७१ १४४४ ५४९.४ ७/१४५ ९/२०७ २०.३३
ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स १४ २८ ७० १४७२ ५५५.३ ५/२८ ७/६९ २१.०२
इंग्लंड स्टुअर्ट ब्रॉड १७ ३२ ६९ १३८६ ४९९.३ ६/३१ १०/६७ २०.०८
न्यूझीलंड टिम साउदी ११ २२ ५६ ११६६ ४३१.३ ५/३२ ९/११० २०.८२
ऑस्ट्रेलिया नॅथन ल्यॉन १४ २७ ५६ १७५७ ६३०.५ ६/४९ १०/११८ ३१.३७
शेवटचे अद्यतन : २३ जून २०२१[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".
  2. ^ "कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर".
  3. ^ "ऑस्ट्रेलियाच्या वेळापत्रकात अफगाणिस्तान कसोटीचा समावेश".
  4. ^ "२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - वैयक्तीक सर्वाधीक धावा". २३ जून २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - वैयक्तीक सर्वाधीक बळी". २३ जून २०२१ रोजी पाहिले.