Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२
ओमान
श्रीलंका
तारीख ७ – ९ ऑक्टोबर २०२१
संघनायक झीशान मकसूद दासून शनाका
२०-२० मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा अकिब इल्यास (६२) अविष्का फर्नांडो (११६)
सर्वाधिक बळी फय्याज बट (३) लाहिरू कुमारा (६)

श्रीलंका क्रिकेट संघाने २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पूर्वसंध्येला दोन अनौपचारिक ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२१ दरम्यान ओमानचा दौरा केला. श्रीलंकेने ओमानविरुद्ध दोन अनौपचारिक ट्वेंटी२० सामने खेळले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांशी खेळले. ऑक्टोबर २०२१ च्या उत्तरार्धात संयुक्त अरब अमिराती आणि ओमान मध्ये झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ही मालिका आयोजित केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲशली डि सिल्वा आणि ओमानचे मुख्य प्रशिक्षक दुलिप मेंडीस यांनी दौऱ्याची पुष्टी केली.

मूलत: मालिकेतील सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असणार होता परंतु श्रीलंका क्रिकेट आणि ओमान क्रिकेट बोर्डाने संगनमताने दोन्ही सामने हे सामान्य ट्वेंटी२० सामने म्हणून खेळविण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने दोन्ही सामन्यांवर वर्चस्व गाजवत मालिका २-० ने जिंकली.

अनौपचारिक ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
७ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१६२/४ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१४३/८ (२० षटके)
नशीम खुशी ४० (२२)
लाहिरू कुमारा ४/३० (४ षटके)
श्रीलंका १९ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: अविष्का फर्नांडो (श्रीलंका)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
  • कश्यप प्रजापती (ओ) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
९ ऑक्टोबर २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
१५९/८ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६३/५ (१७.३ षटके)
अकिब इल्यास ५९ (३८)
लाहिरू कुमारा २/२० (४ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: अकिब इल्यास (ओमान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.