Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२
श्रीलंका
दक्षिण आफ्रिका
तारीख २ – १४ सप्टेंबर २०२१
संघनायक दासून शनाका टेंबा बवुमा (१ला ए.दि.)
केशव महाराज (२रा,३रा ए.दि., ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा चरिथ असलंका (१९६) जानेमन मलान (१६२)
सर्वाधिक बळी दुश्मंत चमीरा (४)
वनिंदु हसरंगा (४)
महीश थीकशाना (४)
तबरैझ शम्सी (८)
मालिकावीर चरिथ असलंका (श्रीलंका)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा दिनेश चंदिमल (७१) क्विंटन डी कॉक (१५३)
सर्वाधिक बळी वनिंदु हसरंगा (३) ब्यॉर्न फॉर्टुइन (५)
मालिकावीर क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. पूर्वनियोजनाप्रमाणे हा दौरा जून २०२० मध्ये होणार होता. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता, तथापि सप्टेंबर २०२१ मध्ये दौरा होणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. सर्व सामने कोलंबोतील रणसिंगे प्रेमदासा मैदानावर खेळविण्यात आले.

श्रीलंकेने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत पावसाचा व्यत्यय आलेला सामना ६७ धावांनी जिंकत मालिका एक सामना शेष असताना १-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. दक्षिण आफ्रिकेचा नियमीत कर्णधार टेंबा बवुमाला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने उर्वरीत दोन एकदिवसीय सामन्यांसाठी केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. श्रीलंकेने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवत एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून दक्षिण आफ्रिकेने दौऱ्याचा विजयाने समारोप केला.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
२ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३००/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२८६/५ (५० षटके)
अविष्का फर्नांडो ११८ (११५)
केशव महाराज २/३० (१० षटके)
एडन मार्करम ९६ (९०)
अकिला धनंजय २/६५ (१० षटके)
श्रीलंका १४ धावांनी विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: अविष्का फर्नांडो (श्रीलंका)

२रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
४ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८३/६ (४७ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९७ (३६.४ षटके)
जानेमन मलान १२१ (१३५)
चमिका करुणारत्ने २/२४ (५ षटके)
चरिथ असलंका ७७ (६९)
तबरैझ शम्सी ५/४९ (७.४ षटके)
दक्षिण आफ्रिका ६७ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: जानेमन मलान (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला. त्यानंतर श्रीलंकेला ४१ षटकांमध्ये २६५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • जॉर्ज लिंडे (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : दक्षिण आफ्रिका - १०, श्रीलंका - ०.


३रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
७ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०३/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२५ (३० षटके)
चरिथ असलंका ४७ (७१)
केशव महाराज ३/३८ (१० षटके)
श्रीलंका ७८ धावांनी विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि लायडन हानीबल (श्री)
सामनावीर: दुश्मंत चमीरा (श्रीलंका)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१० सप्टेंबर २०२१
२०:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६३/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३५/६ (२० षटके)
एडन मार्करम ४८ (३३)
वनिंदु हसरंगा २/२३ (४ षटके)
दिनेश चंदिमल ६६* (५४)
केशव महाराज १/१९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री)
सामनावीर: एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • महीश थीकशाना (श्री) आणि केशव महाराज (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
१२ सप्टेंबर २०२१
२०:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०३ (१८.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०५/१ (१४.१ षटके)
कुशल परेरा ३० (२५)
तबरैझ शम्सी ३/२० (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: तबरैझ शम्सी (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • प्रवीण जयविक्रमा (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
१४ सप्टेंबर २०२१
२०:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२०/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२१/० (१४.४ षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.