२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी)
२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी) | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||||
| ||||||||
संघ | ||||||||
नेपाळ | ओमान | अमेरिका | ||||||
संघनायक | ||||||||
ग्यानेंद्र मल्ल | झीशान मकसूद | सौरभ नेत्रावळकर |
२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी) ही ओमानमध्ये १३ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान ओमानसह नेपाळ आणि अमेरिका या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.
सदर स्पर्धेची ही सहावी फेरी नियोजनाप्रमाणे मार्च २०२१ मध्ये खेळवली जाणार होती, परंतु जगात कोरोनाव्हायरस या रोगाचा फैलाव झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकन क्रिकेट बोर्डाने टेक्सास येथे प्रशिक्षण घेण्यासाठी ४४ खेळाडूंची यादी जाहीर केली. परंतु १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी १३ सप्टेंबर पासून स्पर्धा सुरू होईल असे ओमान क्रिकेट बोर्डाने ऑगस्ट २०२१ मध्ये स्पष्ट केले. पुढच्या आठवड्यात लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले. स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी अमेरिका आणि नेपाळने पापुआ न्यू गिनीविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) द्विपक्षीय मालिका खेळल्या. तेही सामने मस्कतमध्येच पार पडले.
ओमानने तीन सामने जिंकत लीग दोन मध्ये आघाडी कायम ठेवली. अमेरिकेने एक सामना जिंकला तर नेपाळने दोन सामने जिंकले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण |
---|---|---|---|---|---|---|
ओमान | ४ | ३ | १ | ० | ० | ६ |
नेपाळ | ४ | २ | २ | ० | ० | ४ |
अमेरिका | ४ | १ | ३ | ० | ० | २ |
सामने
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.
- नेस्टर धंबा, आयान खान आणि शोएब खान (ओ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- गुल्शन झा (ने) आणि काईल फिलिप (अ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन]
६वा सामना
[संपादन]