१९९०-९१ आशिया चषक
Jump to navigation
Jump to search
१९९०-९१ आशिया चषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय क्रिकेट | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान |
![]() | ||
विजेते |
![]() | ||
सहभाग | ३ | ||
सामने | ४ | ||
मालिकावीर | देण्यात आला नाही | ||
सर्वात जास्त धावा |
![]() | ||
सर्वात जास्त बळी |
![]() | ||
|
१९९०-९१ आशिया चषक, ही आशिया चषक स्पर्धेची चवथी आवृत्ती होती. सदर स्पर्धा २५ डिसेंबर १९९० ते ४ जानेवारी १९९१ दरम्यान भारतात खेळवली गेली होती. स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे तीन संघ सहभागी झाले होते. भारतासोबत ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानने स्पर्धेतून अंग काढून घेतले होते.
सदर स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली गेली, ज्यामध्ये प्रत्येक संघ इतर संघांबरोबर प्रत्येकी एकदा खेळा आणि दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसर्यांदा (एकूण तिसर्यांदा) आशिया चषकावर आपले नाव कोरले.
गुणफलक[संपादन]
संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | धा |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
२ | २ | ० | ० | ० | ४ | ४.९०८ |
![]() |
२ | १ | १ | ० | ० | २ | ४.२२२ |
![]() |
२ | ० | २ | ० | ० | ० | ३.६६३ |
सामने[संपादन]
साखळी सामने[संपादन]
३१ डिसेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- धुक्यामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवला गेला.
- एकदिवसीय पदार्पण: सैफुल इस्लाम (बा) आणि प्रमोद्य विक्रमसिंगे (श्री)
- बांगलादेशची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या.
अंतिम सामना[संपादन]
४ जानेवारी १९९१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- पावसामुळे सामना ३ जानेवारी ऐवजी ४ जानेवारी रोजी खेळवला गेला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा केला गेला.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
बाह्यदुवे[संपादन]
मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो विस्तृत माहिती – क्रिकइन्फो