बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
भारत
बांगलादेश
तारीख ५ – १२ फेब्रुवारी २०१७
संघनायक विराट कोहली मुशफिकुर रहिम
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (२४२) मुशफिकुर रहिम (१५०)
सर्वाधिक बळी रविंद्र जडेजा (६)
रविचंद्रन अश्विन (६)
तास्किन अहमद (४)
तैजुल इस्लाम (४)

फेब्रुवारी २०१७ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर एका कसोटी सामना आला होता.[१][२] हा बांगलादेशचा पाहिलाच भारत दौरा.[३] याआधी हा दौरा ऑगस्ट २०१६ मध्ये आयोजित केला गेला होता, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ केलेल्या इतर आयोजनांमुळे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केले की फेब्रुवारीचा पहिला आठवडा कदाचित योग्य आहे.[४] ऑगस्ट २०१६ मध्ये सामन्याची तारीख पक्की करण्यात आली.[५] जानेवारी २०१७ मध्ये बीसीसीआयने तारीख एक दिवसाने पुढे ढकलली.[६] कसोटी सामन्याआधी, भारत अ आणि बांगलादेश संघादरम्यान दोन-दिवसीय सराव सामना खेळवण्यात आला.[७]

भारताने सामना २०८ धावांनी जिंकला.

कसोटी सामन्या दरम्यान, भारताने अनेक वैयक्तिक आणि सांघिक विक्रम नोंदवले. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली ह्या दोघांनीही वैयक्तिक फलंदाजी विक्रम नोंदवले. पुजाराने १,६०५ धावा करून, भारतीय प्रथमश्रेणी मोसमातील सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम नोंदवला.[८] ह्या आधीचा विक्रम १९६४-६५ साली १,६०४ धावांसाहित चंदू बोर्डे यांच्या नावावर होता.[८] १,१६८ धावांसहित, घरच्या मोसमातील सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीने स्वतःच्या नावावर केला.[९]{याआधीचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर होता, त्याने २००४-०५ मध्ये १,१०५ धावा केल्या होत्या.[९] त्याशिवाय सलग चार कसोटी मालिकांमध्ये चार द्विशतके करणारा कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला. ह्या आधीचा सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतके करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांच्या नावे होता.[९] रविचंद्रन अश्विनने सर्वात जलद २५० कसोटी बळी घेण्याचा विक्रम केला. डेनिस लिलीचा ४८ कसोटी सामन्यांचा विक्रम त्याने ४५ कसोटी सामन्यांत २५० बळी घेऊन मोडला.[१०]

भारताने पहिल्या डाव ६८७ धावांवर घोषित केला आणि कसोटीमध्ये सलग तीन डावांमध्ये ६०० पेक्षा जास्त धावा करण्याचा सांघिक विक्रम केला.[९] ह्या कसोटी सामन्यातील विजयामुळे त्यांनी सलग सहा मालिका विजय मिळवले. ह्या विजयी मालिकेची सुरुवात सप्टेंबर २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाली.[११] बांगलादेशविरुद्धच्या ह्या मालिकाविजयामुळे, कर्णधार म्हणून सलग १९ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला.[११]

मुशफिकुर रहिम हा कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण करणारा चवथा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू ठरला.[१२] सामना पूर्ण होता-होता, हबीबुल बशरला मागे टाकून, तो बांगलादेशचा तिसरा सर्वाधिक कसोटी धावा जमवणारा फलंदाज झाला.[१२]

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत[१३][१४] बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[१५]

सराव सामना[संपादन]

५-६ फेब्रुवारी २०१७
९:३०
धावफलक
वि
२२४/८घो (६७ षटके)
सौम्य सरकार ५२ (७३)
अनिकेत चौधरी ४/२६ (१२ षटके)
४६१/८घो (९० षटके)
विजय शंकर १०३* (८१)
सुभाशिष रॉय ३/५७ (१६ षटके)
७३/२ (१५ षटके)
तमिम इक्बाल ४२* (५४)
कुलदीप यादव २/२ (२ षटके)
  • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
  • प्रत्यकी १४ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक).


एकमेव कसोटी[संपादन]

९-१३ फेब्रुवारी २०१७
९ः३०
धावफलक
वि
६८७/६घो (१६६ षटके)
विराट कोहली २०४ (२४६)
तैजुल इस्लाम ३/१५६ (४७ षटके)
३८८ (१२७.५ षटके)
मुशफिकुर रहिम १२७ (२६२)
उमेश यादव ३/८४ (२५ षटके)
१५९/४घो (२९ षटके)
चेतेश्वर पुजारा ५४* (५८)
तास्किन अहमद २/४३ (७ षटके)
२५० (१००.३ षटके)
महमुदुल्ला ६४ (१४९)
रविचंद्रन अश्विन ४/७३ (३०.३ षटके)


संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "भारतीय क्रिकेट वेळापत्रक २०१६: सामने आणि तारखा". ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "बांगलादेश क्रिकेट बोर्डातर्फे भारतासोबत चार मालिकांचा निर्णय, पहिला कसोटी दौरा २०१६ मध्ये" (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "बीसीसीआयतर्फे सहा नवीन कसोटी मैदानांची घोषणा" (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "सप्टेंबर मध्ये वेस्ट इंडीजचे यजमानपद भूषवण्याचा बांगलादेशचा विचार" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "भारताविरुद्धच्या ८ फेब्रुवारीच्या ऐतिहासिक कसोटीसाठी बांगलादेश सज्ज" (इंग्रजी भाषेत). २९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "भारत-बांगलादेश कसोटी ९ फेब्रुवारीला सुरू होणार" (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "भारत अ संघात जयंत यादव पुनरागमनास सज्ज" (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ a b c "पुजाराने भारतीय प्रथम-श्रेणी क्रिकेट मोसमातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b c d e f g "विराट कोहली: चार मालिकांमध्ये चार द्विशतके". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ a b "अश्विन - सर्वात जलद २५० कसोटी बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ a b "भारताची सलग १९वी अजिंक्य कसोटी आणि सलग सहावा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ a b c "३००० कसोटी धावा पूर्ण करणारा मुशफिकुर रहिम हा चवथा बांगलादेशी फलंदाज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "पाच वर्षांनंतर मुकुंद परतला..." महाराष्ट्र टाइम्स. २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "भारताच्या कसोटी संघात अभिनव मुकुंदची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "भारताविरुद्ध एकमेव एकदिवसीय सामन्यासाठी लितन दासची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "मांडीच्या दुखापतीमुळे इमरुल केस बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "दुखापतग्रस्त अमित मिश्राऐवजी कुलदीप यादवची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "विराटचा द्विशतकांचा चौकार". महाराष्ट्र टाम्स. १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.


बांगलादेश क्रिकेट संघाचे भारत दौरे
२०१६-१७