Jump to content

२०२१-२२ ओमान चौरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१-२२ ओमान चौरंगी मालिका
व्यवस्थापक ओमान क्रिकेट
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान ओमान ओमान
विजेते संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा नेपाळ दिपेंद्र सिंग ऐरी (१४२)
सर्वात जास्त बळी आयर्लंडचे प्रजासत्ताक क्रेग यंग (६)

२०२१-२२ ओमान चौरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा ११ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ओमानमध्ये खेळवली गेली. यजमान ओमानसह संयुक्त अरब अमिराती, नेपाळ आणि आयर्लंड या चार देशांच्या क्रिकेट संघांनी चौरंगी मालिकेत भाग घेतला. सदर मालिका ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित केली होती. सर्व सामने मस्कत मधील अल् अमारत क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.

साखळी सामन्यांच्या शेवटी संयुक्त अरब अमिराती आणि आयर्लंड ह्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुण होते. परंतु आयर्लंडपेक्षा संयुक्त अरब अमिरातीची निव्वळ धावगती जास्त असल्याने संयुक्त अरब अमिराती चौरंगी मालिकेचा विजेता ठरला. नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरी याने सर्वाधिक १४२ धावा केल्या, तर ६ गडी मिळवून स्पर्धेत आयर्लंडचा क्रेग यंग हा आघाडीचा गोलंदाज ठरला.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ०.५४७ विजयी
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ०.४५७
ओमानचा ध्वज ओमान -०.४३८
नेपाळचा ध्वज नेपाळ -०.५९२

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
११ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१३५/६ (२० षटके‌)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३७/४ (१९.३ षटके‌)
झीशान मकसूद ४३* (४१)
अविनाश बोहरा ३/२६ (४ षटके)
नेपाळ ६ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि राहुल अशर (ओ)
सामनावीर: दिपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • शोएब खान (ओ), सागर धकल आणि विवेक यादव (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • नेपाळने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


२रा सामना

[संपादन]
१२ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१९२/३ (२० षटके)‌
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१६७/५ (२० षटके)
चिराग सुरी ८४* (५३)
आरिफ शेख १/१७ (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती २५ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: चिराग सुरी (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • लोकेश बाम (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
१२ फेब्रुवारी २०२२
१२:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१३७ (१९.२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४०/१ (१७.१ षटके)
शोएब खान ५७ (३८)
सिमी सिंग ३/९ (४ षटके)
अँड्रु बल्बिर्नी ७५* (४९)
खावर अली १/२४ (३ षटके)
आयर्लंड ९ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: अँड्रु बल्बिर्नी (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
१३ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१७८/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६५/७ (२० षटके)
रोहन मुस्तफा ५४ (४३)
क्रेग यंग ४/२८ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १३ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि राहुल अशर (ओ)
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.


५वा सामना

[संपादन]
१४ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६४/८ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१६५/३ (१९.३ षटके)
वसीम मुहम्मद ८४ (४४)
आमिर कलीम ५/२९ (४ षटके)
कश्यप प्रजापती ६९* (५३)
काशिफ दाउद १/१३ (२ षटके)
ओमान ७ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: आमिर कलीम (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

[संपादन]
१४ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२७ (२० षटके‌)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१११/९ (२० षटके)
आयर्लंड १६ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: दिपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.