वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
भारत
वेस्ट इंडीज
तारीख २९ सप्टेंबर – ११ नोव्हेंबर २०१८
संघनायक विराट कोहली क्रेग ब्रेथवेट (१ली कसोटी)
जेसन होल्डर (२री कसोटी आणि ए.दि.)
कार्लोस ब्रेथवेट (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा पृथ्वी शाॅ (२३२) रॉस्टन चेझ (१८५)
सर्वाधिक बळी उमेश यादव (११) जेसन होल्डर (५)
मालिकावीर पृथ्वी शाॅ (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (४५३) शिमरॉन हेटमायर (२५९)
सर्वाधिक बळी कुलदीप यादव (९) ॲशली नर्स (५)
२०-२० मालिका

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये दोन कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[१][२][३][४] दौऱ्यापुर्वी, बडोद्यात दोन दिवसीय सराव सामना होईल.[५]

ठरावाप्रमाणे एक एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरमधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असे बीसीसीआयच्या दौरा आणि वेळापत्रक मंडळाने निश्चित केले.[६] परंतु जेव्हा मार्च २०१८मध्ये वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा संबंधीत सामना कोचीतील जवाहरलाल नेहरू मैदान येथे स्थानांतरित करण्यात आला.[६] केरळ क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला निर्णयावर पुनः विचार करण्याची विनंती केली.[६] सरतेशेवटी दोन दिवसांनी सामना तिरुवनंतपुरमलाच होईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले.[७] लखनऊतील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाईल.[८] त्याच महिन्यात बीसीसीआयच्या सुत्रांकडून दुसरा एकदिवसीय सामना इंदूरमधून तिकिट विक्रीसंदर्भातील मतभेदामुळे हलवला जाणार असल्याचे कळले.[९] ३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदानावर होईल असे बीसीसीआयने जाहीर केले.[१०] १२ ऑगस्ट २०१८ला बीसीसीआयने ४था एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमला हलवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर तब्बल ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होईल. या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भारत व श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना २ डिसेंबर २०१८ रोजी झाला.

जेसन होल्डर दुखापतीमुळे पहिली कसोटीला मुकला. त्याच्याजागी कर्णधारपदाची धुरा क्रेग ब्रेथवेटने सांभाळली.[११] भारताच्या टी२० संघात महेंद्रसिंग धोनीऐवजी रिषभ पंतला घेण्यात आले.[१२]

संघ[संपादन]

कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२०
भारतचा ध्वज भारत[१३] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१४] भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१५] भारतचा ध्वज भारत[१२] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१५]

अल्झारी जोसेफला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी वेस्ट इंडीजच्या संघात शर्मन लुईसची निवड करण्यात आली.[१६] भारताच्या एकदिवसीय संघातून शार्दुल ठाकूर बाहेर पडला तर त्याच्याजागी उमेश यादवला घेण्यात आले.[१७] तसेच इव्हिन लुईसने वैयक्तिक कारणासाठी दौऱ्यातून माघार घेतली. त्याची जागा भरून काढण्यासाठी विंडिजच्या एकदिवसीय व ट्वेंटी२० संघात कीरन पॉवेल आणि निकोलस पूरनला घेण्यात आले.[१८] शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराहकेदार जाधव यांची निवड करण्यात आली तर मोहम्मद शमीला डच्चू देण्यात आला.[१९][२०] आंद्रे रसेलला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडीजच्या ट्वेंटी२० संघात शई होपची निवड करण्यात आली.

सराव सामने[संपादन]

दोन-दिवसीय सराव सामना : बोर्ड अध्यक्षीय एकादश वि वेस्ट इंडीज[संपादन]

२९-३० सप्टेंबर २०१८
धावफलक
बोर्ड अध्यक्षीय एकादश भारत
वि
३६०/६घो (९० षटके)
अंकित बावणे ११६* (१९१)
देवेंद्र बिशू ३/१०४ (२१ षटके)
३६६/७घो (८९ षटके)
सुनील आंब्रीस ११४* (९८)
आवेश खान ४/६० (१७ षटके)
सामना अनिर्णित.
रिलायन्स स्टेडियम, बडोदा, गुजरात
पंच: संजय हजारे (भा) आणि अमीष साहेबा (भा)
  • नाणेफेक: बोर्ड अध्यक्षीय एकादश, फलंदाजी


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

४-८ ऑक्टोबर २०१८
धावफलक
वि
६४९/९घो (१४९.५ षटके)
विराट कोहली १३९ (२३०)
देवेंद्र बिशू ४/२१७ (५४ षटके)
१८१ (४८ षटके)
रॉस्टन चेझ ५३ (७९)
रविचंद्रन अश्विन ४/३७ (११ षटके)
१९६ (५०.५ षटके)(फॉ/ऑ)
कीरन पॉवेल ८३ (९३)
कुलदीप यादव ५/५७ (१४ षटके)
भारतचा ध्वज भारत १ डाव आणि २७२ धावांनी विजयी.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट, गुजरात
पंच: इयान गुल्ड (इं) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: पृथ्वी शाॅ (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • पृथ्वी शाॅ (भा) आणि शर्मन लुईस (विं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • भारताच्या सचिन तेंडुलकरनंतर पृथ्वी शाॅ कसोटी शतक ठोकणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला, तर कसोटी पदार्पणातच शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला (१८ वर्षे आणि ३२९ दिवस).[२१]
  • भारताच्या पहिल्या दिवशीतील ३६४ ह्या धावा वेस्ट इंडीजविरुद्ध एका दिवसात केलेल्या सर्वाधीक धावा.
  • विराट कोहलीच्या इ.स. २०१८मध्ये १००० कसोटी धावा पूर्ण तर भारताचा कर्णधार म्हणून त्याचे ३०वे आंतरराष्ट्रीय शतक.
  • रविंद्र जडेजाचे (भा) पहिले कसोटी शतक.
  • कुलदीप यादवचे (भा) कसोटीत प्रथमच पाच बळी.
  • भारताचा मायदेशातील १००वा कसोटी विजय तर एक डाव राखून मिळविलेल्या विजयाचा विचार करता हा सर्वात मोठा विजय.


२री कसोटी[संपादन]

१२-१६ ऑक्टोबर २०१८
धावफलक
वि
३११ (१०१.४ षटके)
रॉस्टन चेझ १०६ (१८९)
उमेश यादव ६/८८ (२६.४ षटके)
३६७ (१०६.४ षटके)
रिषभ पंत ९२ (१३४)
जेसन होल्डर ५/५६ (२३ षटके)
१२७ (४६.१ षटके)
सुनील आंब्रीस ३८ (९५)
उमेश यादव ४/४५ (१२.१ षटके)
७५/० (१६.१ षटके)
पृथ्वी शाॅ ३३* (४५)


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२१ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३२२/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३२६/२ (४२.१ षटके)
शिमरॉन हेटमायर १०६ (७८)
युझवेंद्र चहल ३/४१ (१० षटके)
रोहित शर्मा १५२* (११७)
देवेंद्र बिशू १/७२ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि ४७ चेंडू राखून विजयी.
बर्सापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी, आसाम
पंच: नितिन मेनन (भा) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: विराट कोहली (भारत)


२रा सामना[संपादन]

२४ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३२१/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३२१/७ (५० षटके)
विराट कोहली १५७* (१२९)
ॲशली नर्स २/४६ (१० षटके)
शई होप १२३* (१३४)
कुलदीप यादव ३/६७ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • ओबेड मकॉय (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विराट कोहली (भा) डावांच्या बाबतीत विचार करता सर्वात जलद १०००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला (२०५).
  • भारताचा ९५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आणि हा टप्पा गाठणारा जगातला पहिलाच संघ.


३रा सामना[संपादन]

२७ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८३/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४० (४७.४ षटके)
शई होप ९५ (११३)
जसप्रीत बुमराह ४/३५ (१० षटके)
विराट कोहली १०७ (११९)
मार्लोन सॅम्युएल्स ३/१२ (३.४ षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • फॅबीयान अलेन (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विराट कोहली (भा) एकदिवसीय सामन्यात सलग तीन शतके ठोकणारा कर्णधार म्हणून व भारताचा पहिला तर जगातला दहावा फलंदाज ठरला.
  • भारतामध्ये भारताचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतक करून सुद्धा भारत सामना हरल्याची ही पहिलीच घटना.


४था सामना[संपादन]

२९ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३७७/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५३ (३६.२ षटके)
रोहित शर्मा १६२ (१३७)
केमार रोच २/७४ (१० षटके)
जेसन होल्डर ५४* (७०)
खलील अहमद ३/१३ (५ षटके)
भारतचा ध्वज भारत २२४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई, महाराष्ट्र
पंच: अनिल चौधरी (भा) आणि इयान गुल्ड (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • भारताचा एकदिवसीय सामन्यातला तीसरा सर्वात मोठा विजय तर वेस्ट इंडीजचा भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठा पराभव.


५वा सामना[संपादन]

१ नोव्हेंबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०४ (३१.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०५/१ (१४.५ षटके)
जेसन होल्डर २५ (३३)
रविंद्र जडेजा ४/३४ (९.५ षटके)
रोहित शर्मा ६३* (५६)
ओशेन थॉमस १/३३ (४ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • ह्या मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • रोहित शर्मा (भा) एकदिवसीय सामन्यात २०० षटकार लगावणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला.
  • वेस्ट इंडीजची भारताविरुद्धची एकदिवसीय सामन्यातील निचांकी धावसंख्या.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ली ट्वेंटी२०[संपादन]

४ नोव्हेंबर २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०९/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११०/५ (१७.५ षटके)
फॅबीयान अलेन २७ (२०)
कुलदीप यादव ३/१३ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ५ गडी आणि १३ चेंडू राखून विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता, पश्चिम बंगाल
पंच: सी.के. नंदन (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (भारत)


२री ट्वेंटी२०[संपादन]

६ नोव्हेंबर २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९५/२ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२४/९ (२० षटके)
रोहित शर्मा १११* (६१)
फॅबीयान अलेन १/३३ (४ षटके)


३री ट्वेंटी२०[संपादन]

११ नोव्हेंबर २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८१/३ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८२/४ (२० षटके)
निकोलस पूरन ५३* (२५)
युझवेंद्र चहल २/२८ (४ षटके)
शिखर धवन ९२ (८२)
किमो पॉल २/३२ (३ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि ० चेंडू राखून विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तमिळनाडू
पंच: अनिल चौधरी (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: शिखर धवन (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
  2. ^ "हिंदुस्थानने विश्वचषकासाठी कमर कसली, २०१८-१९च्या मोसमात भारत खेळणार तब्बल ६३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने".
  3. ^ "भारताची पहिली दिवस-रात्र कसोटी कदाचित राजकोट किंवा हैदराबाद येथे खेळवली जाईल".
  4. ^ "विंडिज महत्वपूर्ण भारत दौऱ्यास सज्ज". Archived from the original on 2018-08-29. 2018-09-28 रोजी पाहिले.
  5. ^ "करुण नायर करणार अध्यक्षीय संघाचे सराव सामन्यात नेतृत्व".
  6. ^ a b c "शशी थरूर यांच्यामध्यस्थीने भारत विंडिजच्या वेळापत्रकात बदल करण्याचे प्रयत्न".
  7. ^ "तेंडूलकरच्या याचिकेमुळे विंडिजचा एकदिवसीय सामना पुन: तिरुवनंतपुरमला हलवला".
  8. ^ a b "एकाना स्टेडियम आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज".
  9. ^ "दुसरा ए.दि. सामना इंदूरमधून हलविण्याची शक्यता: सूत्र".
  10. ^ "दुसरा ए.दि. सामना इंदूरवरून विशाखापट्टणमला स्थानांतरित".
  11. ^ "दुखापतग्रस्त होल्डर राजकोट कसोटीतून बाहेर, क्रेग ब्रेथवेट सामन्यासाठी कर्णधार".
  12. ^ a b "भारताचा टी२० संघ जाहीर: कोहलीला विश्रांती. रोहित करणार नेतृत्व तर धोनीला डच्चू".
  13. ^ "पेटीएम कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अगरवालची संघात लागली वर्णी". Archived from the original on 2018-09-29. 2018-10-01 रोजी पाहिले.
  14. ^ "डेवन स्मिथ भारत दौऱ्याला मुकणार".
  15. ^ a b "पोलार्ड, ब्राव्हो यांचे विंडिजच्या टी२० संघात पुनरागमन".
  16. ^ "शर्मन जोसेफच्या जागी विंडिजच्या संघात दाखल".
  17. ^ "शार्दुल पहिल्या दोन ए.दि.साठी बाद, उमेशला संघात स्थान".
  18. ^ "विंडिजचा कणा असलेल्या इव्हिन लुईसची दौऱ्यातून घेतली माघार".
  19. ^ "भुवी आणि बुमराहची शेवटच्या तीन सामन्यासाठी वर्णी".
  20. ^ "पुण्याचा वाघ केदार जाधवचे पुनरागमन".
  21. ^ "पृथ्वी शॉचा पदार्पणातच धमाका, ठोकले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय शतक".


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२