आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२
झिम्बाब्वे महिला
आयर्लंड महिला
तारीख ५ – ११ ऑक्टोबर २०२१
संघनायक मेरी-ॲन मुसोंडा लॉरा डिलेनी
एकदिवसीय मालिका
निकाल आयर्लंड महिला संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा मेरी-ॲन मुसोंडा (१६९) गॅबी लुईस (२६३)
सर्वाधिक बळी जोसेफिन कोमो (४) कॅरा मरे (८)
मालिकावीर गॅबी लुईस (आयर्लंड)

आयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२१ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही संघांनी ही मालिका नोव्हेंबरमध्येच झिम्बाब्वेमध्ये झालेल्या २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली. आयर्लंड महिलांनी तब्बल तीन वर्षांनंतर महिला वनडे सामने खेळले. याआधी आयर्लंड महिलांनी जून २०१८ दरम्यान न्यू झीलंडविरुद्ध खेळले होते. तर एप्रिल २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने संपूर्ण सदस्यांच्या महिला संघाना देखील कायमस्वरूपी महिला कसोटी आणि महिला एकदिवसीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झिम्बाब्वेला महिला एकदिवसीय दर्जा प्राप्त झाला. त्यानुसार झिम्बाब्वे महिलांनी या मालिकेत त्यांचे पहिले महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवण्यात आले.

कर्णधार मेरी-ॲन मुसोंडा हिने झळकावलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने आपल्या पहिल्या वहिल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. महिला एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी मेरी झिम्बाब्वेची पहिली वहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली. आयर्लंडने दुसरा आणि तिसरा सामना जिंकत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. चौथ्या आणि अखेरच्या महिला एकदिवसीय सामन्यात आयर्लंडच्या एमी हंटरने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. तिने १२१ धावांची नाबाद खेळी करत आयर्लंडला पहिल्या डावात ३१२ धावांची मजल मारण्यास यशस्वी केले. एकदिवसीय क्रिकेट प्रकारात (महिला/पुरुष) शतक झळकावणारी एमी ही सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू ठरली. विशेष म्हणजे हा विक्रम एमीने तिच्या १६व्या वाढदिवशीच केला. आयर्लंडने या सामन्यामध्ये झिम्बाब्वेला ८५ धावांनी नमवत चार सामन्यांची महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-१ अश्या फरकाने जिंकली. आयर्लंडने ऑगस्ट २००६ नंतर तब्बल १५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. आयर्लंडच्या गॅबी लुईस हिला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

५ ऑक्टोबर २०२१
०९:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२५३/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२५४/६ (४३.५ षटके)
लॉरा डिलेनी ८६ (८१)
जोसेफिन कोमो २/४६ (९ षटके)
मेरी-ॲन मुसोंडा १०३* (११४)
कॅरा मरे २/४६ (८ षटके)
झिम्बाब्वे महिला ४ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि स्टॅन्ले गोग्वे (झि)
सामनावीर: मेरी-ॲन मुसोंडा (झिम्बाब्वे)


२रा सामना[संपादन]

७ ऑक्टोबर २०२१
०९:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२८६/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०६/९ (५० षटके)
लिआह पॉल ९५ (११८)
जोसेफिन कोमो १/३३ (१० षटके)
जोसेफिन कोमो ७०* (८६)
कॅरा मरे ३/५६ (१० षटके)
आयर्लंड महिला ८० धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि स्टॅन्ले गोग्वे (झि)
सामनावीर: लिआह पॉल (आयर्लंड)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा झिम्बाब्वेवरील हा पहिला विजय.
  • जेन मॅग्वायर (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा सामना[संपादन]

९ ऑक्टोबर २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१७८ (४७ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१७९/२ (३९ षटके)
मेरी-ॲन मुसोंडा २६ (२२)
सीलीस्ती रॅक ३/३४ (१० षटके)
गॅबी लुईस ९६* (१२९)
तसमीन ग्रँगर २/५३ (१० षटके)
आयर्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि स्टॅन्ले गोग्वे (झि)
सामनावीर: गॅबी लुईस (आयर्लंड)


४था सामना[संपादन]

११ ऑक्टोबर २०२१
०९:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
३१२/३ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२२७/८ (५० षटके)
एमी हंटर १२१* (१२७)
जोसेफिन कोमो १/४५ (१० षटके)
जोसेफिन कोमो ६६ (१०६)
लॉरा डिलेनी २/३२ (१० षटके)
आयर्लंड महिला ८५ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि तफाद्झ्वा मुसाक्वा (झि)
सामनावीर: एमी हंटर (आयर्लंड)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.