१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
[[File:Indian Rebellion of 1857.jpg|300px |उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा]]
उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा
दिनांक १० मे १८५७ - २० जून १८५८
स्थान उ.भारतीय मैदानी प्रदेश,बंगाल
परिणती ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल संपुष्टात
शिपायांचा उठाव दडपला गेला
ब्रिटीश राणीचा अंमल सुरु
युद्धमान पक्ष
ईस्ट इंडिया कंपनीचे बंडखोर शिपाई
मुघल
ग्वाल्हेर संस्थान
झाशी संस्थान
मराठा साम्राज्य
ईस्ट इंडिया कंपनी
ब्रिटीश साम्राज्य
भारतातील युरोपीय नागरिक
२१ भारतीय संस्थाने
नेपाळचे साम्राज्य
सेनापती
बहादूरशहा दुसरा
नानासाहेब पेशवे
राणी लक्ष्मीबाई
तात्या टोपे
बख्त खान व इतर
इंग्रजी सेनाधिकारी


१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.
जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

उठावाची कारणे[संपादन]

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटीश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे.ब्रिटीश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली.भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत.शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने नव्या बंदुका आणल्या ज्यामध्ये गायीच्याडुक्कराच्या चरबीपासुन बनवलेली काडतुसे वापरावी लागत.गाय हिंदूना तर डुक्कर मुसलमानांना पवित्र असते.अशी काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले.